जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..." By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 2:29 PM1 / 9रितेश-जिनिलीया हे मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2 / 9अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर रितेश आणि जिनिलीयाने २०१२ साली लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. 3 / 9नुकतीच जिनिलीयाने श्रेया घोडावत या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत जिनिलीयाने रितेशबरोबरच्या ब्रेकअपचा किस्सा सांगितला. 4 / 9जिनिलीया म्हणाली, 'रितेशने मला रात्री १ वाजताच्या सुमारास आपण इथेच थांबुया असा मेसेज केला आणि तो झोपून गेला'. 5 / 9'मी रात्री २.३० वाजता रितेशचा मेसेज वाचला. मला कळत नव्हतं नेमकं काय झालंय. सकाळी ९ वाजेपर्यंत मी स्वत:ची वाईट अवस्था करून घेतली होती'. 6 / 9'सकाळी रितेश उठला आणि त्याला माहीतही नव्हतं की त्याने रात्री असा मेसेज केला आहे. त्याने मला फोन केला आणि काय करतेस असं विचारलं'. 7 / 9'मी त्याला म्हटलं की मला नाही वाटत आपण बोललं पाहिजे. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. रितेशने मला विचारलं की काय झालंय?' 8 / 9'तेव्हा मी त्याला त्याच्या मेसेजची आठवण करून दिली. पण त्याने १ एप्रिलला मला एप्रिल फूल बनवण्यासाठी तो मेसेज केला होता', असं जिनिलीयाने सांगितलं. 9 / 9खरं तर रितेश -जिनिलीयाचं ब्रेकअप झालं नव्हतं. तर रितेशने एप्रिल फूल डे च्या दिवशी जिनिलीयाबरोबर हा प्रँक केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications