Join us

‘गजनी’ फेम अभिनेत्री आता काय करते? गेल्या कित्येक वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:59 IST

1 / 8
२००८ साली प्रदर्शित झालेला गजनी चित्रपट आठवतो का तुम्हाला? आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असीन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
2 / 8
विशेष म्हणजे या चित्रपटात उत्कृष्ट काम केल्यामुळे सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री म्हणून असीनला पुरस्कारदेखील मिळाला होता.
3 / 8
असीन दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून गजनीच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. वयाच्या १५ व्या वर्षापासून असीन दाक्षिणात्य कलाविश्वात कार्यरत आहे.
4 / 8
माकन जयकांतन वाका या चित्रटातून मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करणारी असीन गेल्या काही काळापासून कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.
5 / 8
असीनने गजनीसह रेडी, खिलाडी 786, हाऊसफुल्ल 2, बोल बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
6 / 8
सध्या असीन कलाविश्वापासून दूर असली तरीदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
7 / 8
असीनने २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचे को फाऊंडर राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हापासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. अक्षय कुमारमुळे असीन आणि राहुल शर्मा यांची भेट झाली. या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं.
8 / 8
असीनला एक लहान मुलगी असून ती तिचा वेळ जास्तीत जास्त आपल्या लेकीसोबत घालवत असते.
टॅग्स :असिनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा