ढाब्यावर करायचा काम, रोहित शेट्टीच्या सिनेमात चमकला अन् रातोरात झाला स्टार! कोण आहे हा अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:29 IST
1 / 7फोटोतील या अभिनेत्याला ओळखलं? सुरुवातीला बांधकाम साईट्सवर मोलमजुरी करायचा. हाच व्यक्ती आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे2 / 7या अभिनेत्याचं नाव आहे संजय मिश्रा. संजय मिश्रा हे सुरुवातीला ढाब्यावर काम करायचे. पण एका सिनेमातून त्यांना संधी मिळाली अन् ते रातोरात स्टार झाले.3 / 7मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या संजय मिश्रा यांनी सुरुवातीला घराला हातभार लावण्यासाठी एका बांधकाम साईटवर मोलमजुरी केली होती.4 / 7संजय मिश्रांचे त्यांच्या वडिलांसोबत चांगले संबंध होते. परंतु वडिलांचं निधन झाल्यावर ते मानसिकरित्या खचले. त्यानंतर सर्व काही सोडून ते हृषिकेशला एका ढाब्यावर काम करु लागले5 / 7रोहित शेट्टींनी जेव्हा 'ऑल द बेस्ट' सिनेमा बनवायला घेतला तेव्हा त्यांनी संजय मिश्रांना शोधलं. ढाब्यावर काम करणाऱ्या संजय मिश्रांना रोहित पुन्हा सिनेमात घेऊन आले6 / 7'ऑल द बेस्ट' सिनेमानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पुढे 'आँखो देखी', 'कामयाब', 'भक्षक', 'वध' पासून आताच्या 'भूल भूलैय्या ३'पर्यंत त्यांनी लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत7 / 7संजय मिश्रा यांचं लोणावळ्याला फार्महाऊस असून यात त्यांनी सुंदर असं शिवमंदिर बांधलं आहे. संजय मिश्रा यांना अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये मानाचं स्थान आहे.