Join us  

Sonalee Kulkarniकडे पण गुड न्यूज?, नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 7:03 PM

1 / 8
बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आलिया भट आणि रणबीर कपूरने आई बाबा होण्याची बातमी दिल्यापासून सगळीकडे त्यांच्या होणाऱ्या बाळाचीच चर्चा सुरू आहे. सध्या मराठीतील सोनाली कुलकर्णीकडे सुद्धा गुड न्यूज आहे अशी शंका वर्तवली जातेय. मात्र आता याबाबतचा सोनालीने खुलासा केला आहे.
2 / 8
सोनाली कुलकर्णीसुद्धा आई होणार आहे, असा अंदाज सध्या तिचे चाहते लावताना दिसत आहेत. त्यांनी तिच्या आउटफिटवरून हा तर्क लावला आहे.
3 / 8
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी गुड न्यूज देताना फॉलो केलेला ट्रेंड होता पोलका डॉट्सचा ड्रेस. तोच ड्रेस सध्या सोनाली कुलकर्णीने घातल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या चाहत्यांकडून गुड न्यूज आहे का अशी विचारणा होते आहे.
4 / 8
एका नेटकरीने तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिलं, तुमच्याकडे पण गुड न्यूज काय? ड्रेस कोड वगैरे
5 / 8
तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे. आणखी एकाने लिहिले की ब्लॅक ड्रेस आणि व्हाईट डॉट्स याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.
6 / 8
सोनालीच्या ड्रेसकडे पाहून नेटकरी वेगवेगळे तर्क वितर्क लावताना दिसत आहेत. मात्र आता याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने कमेंटमध्ये केला आहे.
7 / 8
सोनाली कुलकर्णीने कमेंटमध्ये लिहिले की, जे कोणी विचारत आहे की मी प्रेग्नेंट आहे का, त्यांना सांगते की, मी प्रेग्नेंट नाही. माझा नुकताच स्वप्नातील परफॉर्मन्स तमाशा लाइव्ह भेटीला आला आहे. सिनेमागृहात जाऊन पाहा.
8 / 8
सोनाली कुलकर्णीच्या उत्तराने प्रेग्नेंट असल्याच्या तर्कवितर्कांंना पूर्णविराम लागला आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी