गोविंदा एकटा नाही, 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील बंदुकीच्या गोळीतून वाचले! By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 3:00 PM1 / 10अभिनेता गोविंदाला त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याच्या पायात गोळी घुसली होती ती डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढली आहे. 2 / 10पण, तुम्हाला माहितेय का फक्त गोविंदाच नाही तर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीदेखील आहेत, जे बंदुकीच्या गोळीतून वाचलेत. ते कोण आहेत, आपण जाणून घ्या. 3 / 10बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते राकेश रोशन यांनीही मृत्यूला मात दिली आहे. २१ जानेवारी २००० रोजी संध्याकाळी राकेश रोशन यांच्यावर मुंबई येथील सांताक्रूझ वेस्ट टिळक रोड येथील त्यांच्या ऑफिसबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. 4 / 10या चकमकीत त्यांच्या डाव्या हाताला आणि छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या. हल्लेखोर घटनास्थळावरून लगेचच पळून गेले होते. गोळी त्याच्या हृदयाच्या स्पर्श करून त्यांच्या छातीच्या हाडाजवळ अडकली होती.5 / 10बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला 'ब्लँक' गोळी लागली होता. त्या गोळ्यांचा वापर शुटिंग दरम्यान केला जातो. गँगस्टर मन्या सुर्वेवर आधारित चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता. त्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी अभिनेत्याला 'ब्लँक' गोळी लागली होती. वास्तविक बुलेटचा प्रभाव देण्यासाठी या बुलेटचा वापर चित्रपटांमध्ये केला जातो.6 / 10अभिनेत्री कतरिना कैफ आणि इम्रान खान स्टारर 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये कतरिनाच्या भोवती अनेक बंदुका होत्या. शूटिंगदरम्यान कतरिनाला चुकून बंदुकीच्या बटने दुखापत झाली.7 / 10 ही जखम इतकी गंभीर होती की कतरिनाच्या नाकातून रक्त येऊ लागले. मात्र, सेटवर प्रथमोपचार केल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले असता तिचा रक्तस्त्राव थांबला होता.8 / 10अमिताभ बच्चन यांचाही एक किस्सा आहे. शोले सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते थोडक्यात बचावले होते. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये वीरूला बसंतीला वाचवायचे होते. हे दृश्य वास्तववादी दिसावे, यासाठी खऱ्या बुलेट आणल्या होत्या. 9 / 10पण अनेक रिटेक करूनही धर्मेंद्र (वीरू) गोळ्यांचा बॉक्स उघडू शकत नव्हते. चित्रपटात सीन असा होता की, धर्मेंद्र (वीरू)ने बंदुकीच्या गोळ्या खिशात ठेवायच्या होत्या. पण धर्मेंद्रने या गोळ्या बंदुकीत भरल्या आणि गोळीबार केला. यामुळे सेटवर उपस्थित असलेले सर्वजण घाबरले. यातील एक गोळी अमिताभ बच्चन यांच्या अगदी जवळून गेली आणि ते थोडक्यात बचावले.10 / 10 मुंबईत सलमान खानच्या घरावरही गोळीबार झाला होता. त्याची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. एवढेच नाही तर बिश्नोई गँगने सांगितले की, 'हरणाची शिकार केल्याप्रकरणी आम्ही सलमान खानला माफ करणार नाही'. आणखी वाचा Subscribe to Notifications