Join us

मिस यूनिव्हर्स हरनाजला हे काय झालं? किताब मिळाल्यापासून ३ महिन्यातच ओळखणं झालं कठिण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:14 PM

1 / 8
मिस यूनिव्हर्स २०२१ चा किताब आपल्या नावे करणारी हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे. हरनाज संधूच्या डोक्यावर जेव्ह मुकूट ठेवण्यात आला तेव्हा तिच्या सुंदरतेचं कौतुक फक्त भारतातच नाही तर जगभरात झालं होतं. (Photo Credit- @Harnaaz Sandhu & @lakmefashionwk Instagram)
2 / 8
मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर हरनाज संधूची फॅन फॉलोईंग कमालीची वाढली. हरनाजच्या लूकपासून ते स्टाइल स्टेटमेंटसाठी फॅन्स तिला फॉलो करतात. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे.
3 / 8
हरनाज डिसेंबर २०२१ मध्ये मिस यूनिव्हर्स बनली होती. तेव्हा तिच्या सौंदर्यासोबतच तिची फिटनेस आणि टोन्ड बॉडी पाहून फॅन्स तिच्या फिदा झाले होते. तरूणींनी तर हरनाजसारखी बॉडी मिळावी याची स्वप्नेही पाहिली असतील. पण आता मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर काही महिन्यातच हरनाजचं बदलेलं रूप पाहून फॅन्स हैराण झाले आहेत.
4 / 8
मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर काही महिन्यातच हरनाजचं वजन वाढलं आहे. फिट अॅन्ड ग्लॅमरस हरनाज आता गोलू-मोलू दिसू लागली आहे. आता फॅन्स प्रश्न पडला आहे की, असं काय झालं की, हरनाजचा लूक पूर्णपणे बदलला?
5 / 8
लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाज संधूनेही रॅम्प वॉक केला. हरनाजच्या वॉक सर्वांनाच इम्प्रेस केलं. पण तिच्यात झालेला हा बदला बघून सगळेच शॉक्ड झाले. हरनाजच्या बॉडीमध्ये इतका बदल कसा झाला हे तर तिच सांगू शकते. मात्र या लूकमध्येही ती सुंदर दिसत आहे.
6 / 8
दरम्यान, मिस यूनिव्हर्स स्पर्धेत भाग घेण्याच्या ३ दिवसांआधी हरनाज हॉस्पिटलमध्ये होती. हरनाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं. हरनाज म्हणाली होती की, माझ्या आईने मला सांगितलं होतं की, मला यावर्षीच स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.
7 / 8
हरनाज म्हणाली होती की, 'मी मिस यूनिव्हर्समध्ये भाग घेण्याच्या तीन दिवसआधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी मला माझ्या Celiac आजाराबाबत समजलं होतं. मला समजलं की, मला ग्लूटेनपासून अॅलर्जी होती. या कारणाने आपलं वजन अनेकदा वाढतं.
8 / 8
हरनाजची फॅन फॉलोईंग खूप वाढली आहे. ते तिला फॉलो करतात. तिच्यात झालेला बदल पाहून फॅन्स हैराण नक्कीच आहेत. पण त्यामुळे तिच्यावरील त्यांचं प्रेम जराही कमी झालेलं नाही.
टॅग्स :हरनाज संधूमिस युनिव्हर्सलॅक्मे फॅशन वीक