'रंग माझा वेगळा'मधील श्वेताच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहतात एकदम साध्या By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 4:13 PM1 / 11स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्व पात्र घराघरात पोहचली.2 / 11या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे आणि तिने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. 3 / 11फार कमी लोकांना माहित असेल की, अनघा ही भगरे गुरूजींची कन्या आहे.4 / 11नुकताच अनघा भगरे हिने पहिल्यांदाच आईचा फोटो शेअर केला आहे. तिची आई खूपच साधी आहे.5 / 11अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. 6 / 11'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.7 / 11अनघाने नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. 8 / 11'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. 9 / 11याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता.10 / 11अनघा भगरे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.11 / 11अनघाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications