ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर! पाहा सुपरस्टार महेश बाबूचा डाएट प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 3:22 PM1 / 9दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. नुकताच त्याने त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला.2 / 9१९९९ मध्ये महेश बाबूने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ओक्काडू या चित्रपटातून त्याने दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण केलं.3 / 9साऊथचा हँण्डसम हंक असलेल्या महेश बाबूने ४८ व्या वर्षात पदार्पण केलं असलं तरीदेखील त्याचा फिटनेस २५ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा आहे. 4 / 9महेश बाबू त्याच्या फिटनेसच्या बाबतीत चांगलाच सजग आहे. त्यामुळे तो त्याच्या डाएटकडे आणि वर्कआऊटकडे जातीने लक्ष देतो.5 / 9फिट राहण्यासाठी महेश बाबू कोणता डाएट प्लॅन घेतो ते पाहुयात.6 / 9महेश बाबू सकाळी ब्रेकफास्टमध्ये ओट्स, अंडी, सुकामेवा आणि ताजी फळं यांचा समावेश करतो.7 / 9लंचमध्ये महेश बाबूला प्रोटीन रिच फूड, लीन मीट आणि कार्ब्सयुक्त पदार्थ यांचा समावेश करायला आवडतो.8 / 9महेश बाबू रात्रीच्या जेवणात फार मोजक्या पदार्थांचा समावेश करतो. यात चिकन, डाळ किंवा सूप यांचा समावेश असतो.9 / 9महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications