Join us

कुणाचा व्यायाम करताना तर कुणाचा क्रिकेट खेळताना; वर्षभरात 'या' कलाकारांचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 6:42 PM

1 / 7
अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. वर्कआउट करत असताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींचा हार्ट अटॅकने मृत्यू झआला आहे. कुणाचा व्यायाम करताना, तर कुणाचा खेळताना.
2 / 7
सिद्धांत वीर- कुसुम, वारीस, सूर्यपुत्र कर्ण यांसारख्या मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचा शुक्रवारी जिममध्ये वर्कआउट करताना मृत्यू झाला. 46 वर्षीय सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला होता. या बातमीमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
3 / 7
सागर पांडे- 30 सप्टेंबर रोजी सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 50 वर्षीय सागरलाही जिममध्ये व्यायाम करत असताना अटॅक आला होता.
4 / 7
राजू श्रीवास्तव- कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना दिल्लीत वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला. सुमारे 40 दिवस त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले होते. राजू 50 वर्षांचे होते.
5 / 7
पुनीत राजकुमार- प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार यांचाही जिममध्ये वर्कआउट करताना मृत्यू झाला. त्यावेळी लोकांमध्ये अशी चर्चा होती की, अतिव्यायाम हेच त्यांच्या मृत्यूचे कारण आहे. मात्र, याबाबत कोणत्याही तज्ज्ञाने प्रतिक्रिया दिली नाही. पुनीत 46 वर्षांचे होते.
6 / 7
दीपेश भान- भाबीजी घर पर है फेम अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाची बातमीही धक्कादायक होती. क्रिकेट खेळताना ते अचानक कोसळले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
7 / 7
केके- गायक केके यांचा वर्कआउट दरम्यान मृत्यू झाला नाही, परंतु लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना अटॅक आला. 53 वर्षीय केके यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला.
टॅग्स :हृदयविकाराचा झटकाबॉलिवूडमृत्यू