एका गाण्याने रातोरात बनली स्टार! असा आहे मराठमोळ्या मिथिला पालकरचा फिल्मी प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 7:46 PM1 / 11मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचा आज (११ जानेवारी) वाढदिवस आहे. 2 / 11या खास दिवशी केवळ बॉलिवूडच नाही तर तिचे चाहतेही शुभेच्छा देत आहेत.3 / 11 मिथिला पालकरचा जन्म ११ जानेवारी १९९३ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. 4 / 11आपल्या अभिनयातून मिथिलाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे.5 / 11मराठी, हिंदी सिनेमे आणि सीरिजमध्ये ती दिसली आहे. 6 / 11मिथिलाने 2014 मध्ये मराठी लघुपट 'माझा हनीमून'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ही शॉर्ट फिल्म मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवण्यात आली होती. 7 / 11मराठी गाणे तुझी चाल तुरुतरु या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. या एका गाण्याने मिथिला पालकरला रातोरात स्टार बनवलं होतं. 8 / 11 मिथिलाच्या 'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटल थिंग्स' या दोन्ही वेबसीरीज लोकप्रिय आहेत. यात साकारलेल्या भुमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.9 / 11मिथिलाचा पहिला हिंदी चित्रपट 'कट्टी-बट्टी' होता. हा चित्रपट निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात मिथिलाने इम्रान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.10 / 11मिथिलाने इरफान खान आणि अभिनेता दुलकर सलमान यांच्यासोबत 'कारवां' सिनेमात एकत्र काम केलं होतं. 11 / 11अभिनेत्री काजोलसोबत 'त्रिभंगा'मध्येही ती झळकली होती. या चित्रपटात मिथिलाने काजोलच्या मुलीची भूमिका साकारली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications