रोडपती ते करोडपती... वाचा काय करतात अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीचे हे 10 विनर By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 2:17 PM1 / 10कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे एका क्षणात हर्षवर्धन नवाठेचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्याने पैसे जिंकल्यानंतर लंडनमध्ये जाऊन एमबीए केले. आता तो महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत चांगल्या पदावर आहे. त्याचे लग्न सारिका नीलत्कर या अभिनेत्रीशी झाले असून तिने पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर, एक डाव संसाराचा यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2 / 10रवी सैनी कौन बनेगा करोडपती (ज्युनिअर) या कार्यक्रमात एक कोटी रुपये जिंकले होते. त्याला मिळालेल्या पैशांचा वापर त्याने त्याच्या शिक्षणासाठी केला. त्याने काही वर्षांपूर्वी युपीएससीची परीक्षा पास केली असून तो आता आयपीएस अधिकारी बनला आहे.3 / 10राहत तस्लिमला आपल्याला कौन बनेगा करोडपीच्या चौथ्या सिझनमध्ये पाहायला मिळाले होते. तिच्या कुटुंबियांच्या दबावामुळे तिला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. त्यांनी खूपच कमी वयात तिचे लग्न करून दिले होते. पण तिने कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक करोड रुपये जिंकत तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. तिला मिळालेल्या पैशांतून तिने कपड्यांचे मोठाले दुकान सुरू केले आहे. 4 / 10कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये सुशील कुमारने ५ करोड रुपये जिंकले होते. टॅक्स कापल्यानंतर त्याला ३.६ करोड रुपये इतकी रक्कम मिळाली होती. त्याने या पैशांतून कुटुंबियांसाठी तीन मजली मोठे घर बांधले. घर बांधल्यानंतर मोतिहारीमध्ये त्याने आईच्या नावावर काही जमीन घेतली. त्यानंतर भाऊ आणि काही नातेवाईकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली. त्याने दिल्लीत कॅबचा व्यवसाय देखील सुरू केला होता. तसेच काही दुकाने मोतिहारीमध्ये घेतली होती आणि शिल्लक राहिलेले पैसे बँकेत ठेवून त्यावर त्याला व्याज मिळते. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात येण्यापूर्वी सुशील एका ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. आता तो कोटोवा गावातील मचरगावा पंचायतीच्या हद्दीतील ४० गरीब मुलांना शिकवतो. हे काम तो कोणतेही पैसे न घेता करतो. हे गाव त्याच्या घरापासून काही किमीवर आहे. तसेच तो एका सरकारी शाळेत शिक्षक आहे. तसेच तो सुशील द बेटर इंडिया या अभियानाअंतर्गत झाडे लागवडीचे काम करतो. त्याने बिहारमध्ये या अभियानाअंतर्गत ७० हजार झाडे लावली आहेत.5 / 10सुनमित कौर यांनी कौन बनेगा करोडपतीच्या सहाव्या सिझनमध्ये पाच करोड रुपये जिंकले होते. त्यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला असून स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला आहे. 6 / 10ताज मोहोम्मद रंगरेज हे पेशाने शिक्षक असून त्यांनी कौन बनेगा करोडपतीच्या सातव्या सिझनमध्ये एक करोड रुपये जिंकले होते. त्यांनी यातील काही पैसे त्यांच्या मुलीच्या डोळ्यांच्या ट्रीटमेंटसाठी वापरले. तसेच त्यांनी या पैशांतून घर घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी दोन अनाथ मुलींच्या लग्नासाठी काही पैसे दिले. 7 / 10अचिन नरुला आणि सार्थक नरुला यांनी कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या सिझनमध्ये सात करोड रुपये जिंकले होते. त्यांनी यातील काही पैशांचा वापर आईच्या उपचारासाठी केला. त्यांच्या आईला कॅन्सर झाला होता तर उरलेल्या पैशांतून त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. 8 / 10अनामिका मुझुमदार यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक करोड रुपये जिंकले होते. त्या एक समाजसेविका असून एक एनजीओ चालवतात. त्यांनी जिंकलेल्या सगळ्या पैशांचा उपयोग त्यांच्या एनजीओसाठी केला. त्या आता अधिकाधिक लोकांची याद्वारे मदत करतात. 9 / 10बिनिता जैन यांनी एक करोड रुपयांचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी केला आणि त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले. 10 / 10कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनमध्ये सनोज राजने एक करोड रुपये जिंकले होते. त्याला आएएस ऑफिसर बनायचे असून तो त्यासाठी मेहनत घेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications