IN PICS : म्हणून मी गप्प राहिलो...! नेहा कक्करशी ब्रेकअपवर हिमांश कोहलीनं सोडलं मौन By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 5:44 PM1 / 9बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि अभिनेता हिमांश कोहली (Himansh Kohli) दीर्घकाळ एकमेकांसोबत नात्यात होते. मात्र 2018 मध्ये अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी या ब्रेकअपची चांगलीच चर्चा झाली होती.2 / 9ब्रेकअपनंतर नेहा कक्कर अनेकप्रसंगी व्यक्त झाली. अनेकदा ब्रेकअपच्या दु:खात रडताना दिसली. पण हिमांशने मात्र यावर मौन बाळगणे पसंत केले, आता मात्र सुमारे दोन वर्षानंतर तो या ब्रेकअपवर बोलला.3 / 9‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला, इतक्या दिवस यावर का बोलला नाहीस? याचे उत्तर त्याने या मुलाखतीत त्याने दिले.4 / 9हे माझे ब्रेकअप होते. मी जगाला ओरडून याबद्दल का सांगू? माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरू आहे, याच्याशी लोकांचा काय संबध? असा सवाल त्याने या प्रश्नाचे उत्तर देताना उपस्थित केला.5 / 9अर्थात लोकांनी माझ्या चुप्पीचा वेगळा अर्थ काढला. अनेकांनी मलाच वाईट ठरवले. तुम्ही बोलत नसाल तर तुम्हीच दोषी ठरता, हा जणू नियम आहे. पण खासगी आयुष्य नावाचीही गोष्ट असते. मला माझ्या पर्सनल गोष्टी लोकांसमोर मांडायला आवडत नाही, असे तो म्हणाला.6 / 9आमच्या दोघांचे 2018 मध्येच ब्रेकअप झाले होते आणि मी यासाठी नेहाला कधीच दोषी ठरवले नव्हते. आता ती आयुष्यात बरीच पुढे निघून गेलीये, आनंदी आहे. मी सुद्धा माझे काम करतोय. पण काही लोक मात्र अजूनही 2018 मध्येच अडकून पडले आहेत. मी वाईट आहे, हे जणू लोकांनी ठरवून टाकलेय. पण मी आनंदी आहे. कारण मी वाईट नाही, हे मला चांगले ठाऊक आहे, असेही त्याने स्पष्ट केले.7 / 9ती रागात होती, म्हणून तिने एक दोन पोस्ट केल्या. मी सुद्धा रागात होतो. पण मी यावर काहीही न बोलणे पसंत केले, असेही तो म्हणाला.8 / 9काही लोक टॉक्सिक आहेत जे बळजबरीने तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार ठरवतात. मी कोणाची तक्रार करत नाही. त्यासाठी मी यावर कधीच काही बोललो नाही, असे त्याने सांगितले.9 / 9 हिमांश कोहलीशी ब्रेकअप झाल्यानंतर गेल्या वर्षी नेहा कक्करने रोहनप्रीत सिंगसोबत लग्नगाठ बांधली. आणखी वाचा Subscribe to Notifications