Join us

Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 4:07 PM

1 / 11
हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती लोकप्रिय झाली.
2 / 11
हिना अनेक चित्रपट आणि सीरिजमध्येही दिसली आहे. अभिनेत्री तिच्या कामाबद्दल खूप उत्साही आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
3 / 11
अभिनेत्रीने आता मासिक पाळीसंदर्भात आपलं मत मांडलं आहे. तिने मासिक पाळीचे पहिले दोन दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय असायला हवा,विशेषतः जेव्हा पळण्याचा सीन असतो असं म्हटलं आहे.
4 / 11
हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून मासिक पाळीतील दोन दिवस शूटिंग न करण्यावर भर दिला आहे.
5 / 11
'जर माझ्या मासिक पाळीतील पहिले 2 दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय मला मिळाला असता तर... मी अतिशयोक्ती करत नाही.'
6 / 11
'वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना 40 डिग्री उष्णतेमध्ये बाहेरच्या ठिकाणी शूटिंग करण्याची कल्पना करा.'
7 / 11
'मूड स्विंग्स होणं, डिडायड्रेशन, गरमीमध्ये रॅशेस येतात. अस्वस्थ वाटत राहतं. ब्लड प्रेशर लो होऊन जातं.'
8 / 11
उन्हात अशाप्रकारचा सीक्वेन्स शूट करण्यासाठी खूप धावपळ करावी लागणं हे वेड होण्यासारखं आहे' असं हिनाने म्हटलं आहे. तसेच ActorsLife हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
9 / 11
हिना खान 'शिंदा शिंदा नो पापा' या पंजाबी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात हिना खानसोबत गिप्पी ग्रेवाल दिसला होता.
10 / 11
अभिनेत्री लवकरच 'नामाकूल' या कॉमेडी ड्रामा वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर फिदा होतात.
11 / 11
टॅग्स :हिना खान