अभिनयच नाही तर व्यवसायातही अजमावतायत नशीब; 'या' टीव्ही अभिनेत्रींनी निवडल्या वेगळ्या वाटा By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 4:38 PM1 / 8छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलंस करणाऱ्या या नायिका यशस्वीरित्या व्यवसायातही त्यांचं नशीब अजमावत आहेत. चला तर मग जाणून घेऊया... 2 / 8टीव्ही अॅक्ट्रेस सरगुन मेहता व्यवसायतून चांगले पैसे कमावते. सरगुन आणि तिचा नवरा रवि दुबे यांचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. 'नामा ड्रीमियाटा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' असं त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. 3 / 8मौनी रॉय या अभिनेत्रीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सध्याच्या घडीला मौनी एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. तिने गेल्या वर्षीच मुंबईत 'बदमाश' नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं.4 / 8'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या वडिलांसोबत एक अॅड एजेंसी चालवते. 5 / 8अभिनेत्रीचं मुंबई आणि बंगळूरु येथे स्वत: च्या मालकिचं रेस्टॉरंट आहे. त्यातून ती चांगली कमाई करते. 6 / 8'तारक मेहता फेम' अभिनेत्री सिंपल कौल एक रेस्टॉरंट चालवते. ज्याच्या माध्यमातून तिला चांगलं उत्पन्न मिळतं. 7 / 8अभिनय क्षेत्राला रामराम केल्यानंतर आशका गोराडियाने २०१९ मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अभिनेत्री कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअर ब्रॅंड 'रेनी कॉस्मेटिक्स' च्या विक्रीतून बक्कळ कमाई करते. 8 / 8रक्षंदा खान एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांभाळते. त्यासोबतच तिचं स्वत:च्या मालकिचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications