Join us

Holi Songs 2022: 'रंग बरसे' ते 'बलम पिचकारी' या बॉलिवूडमधील टॉप १० होळी गाण्यांशिवाय सेलिब्रेशन अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 8:00 AM

1 / 10
रंग बरसे : अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला सिलसिला १९८१ हा चित्रपट खूप गाजला.
2 / 10
होली के दिन: शोले (1975) चित्रपटातील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भूमिका असलेले हे गाणे देखील प्रेक्षकांना खूप आवडते. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले होते.
3 / 10
बलम पिचकारी: बालम पिचकारी: ये जवानी है दिवानी (२०१३) चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूर यांची भूमिका असलेले, हे गाणे शाल्मली खोलगडे आणि विशाल ददलानी यांनी गायले होते.
4 / 10
गली गली: पटाखा (2018) या चित्रपटातील सान्या मल्होत्रा ​​आणि राधिका मदन या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हे गाणे सुखविंदर सिंगने गायले होते.
5 / 10
सोनी सोनी: मोहब्बतें (2000) चित्रपटातील उदित नारायण यांनी गायले आहे, या गाण्यात शाहरुख खानने जबरदस्त डान्स केला होता. या गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला होळी खेळायचं मनं नक्की करेल.
6 / 10
होली खेले रघुवीरा: चित्रपट बागबान (२००३) अमिताभ बच्चन यांचे हे गाणे हेमा मालिनी आणि अमिताभ जी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
7 / 10
लहू मुंह लग गया: 'गोलियों की रासलीला राम-लीला' (२०१३) चित्रपटातील या गाण्यात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळाली.
8 / 10
डू मी अ फेवर लेट्स प्ले होली: वक्त (2005) चित्रपटातील अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा चित्रित झालेले हे गाणं जबरदस्त आहे. हे गाणे अनु मलिक आणि सुनिधी चौहान यांनी गायले आहे.
9 / 10
बद्री की दुल्हनिया: वरूण धवन आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या बद्रीनाथ की दुल्हनिया (2017) चित्रपटातील हे गाणे होळीच्या दिवशी कोणी ऐकले तर नक्कीच यावर ठेका धरेल.
10 / 10
आज ना छोडेंगे: 'कटी पतंग' या चित्रपटातील हे गाणे जेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झाले आहे.
टॅग्स :बॉलिवूडहोळी 2023