Join us

बॉलिवूडच्या 'या' ७ सुपरहिट सिनेमांचे हॉलिवूडमध्ये बनवण्यात आले रीमेक, बघा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 1:17 PM

1 / 8
बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे हॉलिवूडवरून इन्स्पायर होऊन बनवले जातात. बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमांचेही अनेक रिमेक बघायला मिळतात. पण तुम्हाला माहीत नसेल पण हॉलिवूडही बॉलिवूडवरून इन्स्पायर होतं. हॉलिवूडमध्ये बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचे रीमेक बनवले आहेत. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या या सिनेमांचे हॉलिवूडमध्ये रिमेक केले ते प्रेक्षकांना खूप आवडले. अशाच बॉलिवूडच्या ७ सिनेमांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे रीमेक हॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनी करण्यात आले.
2 / 8
१९९५ मध्ये आलेल्या 'रंगीला' सिनेमाचा Win A Date With Tad Hamilton हा सिनेमा रीमेक आहे. हॉलिवूडमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा 'रंगीला' सिनेमाची ट्रू कॉपी आहे. हॉलिवूडमध्ये या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली होती.
3 / 8
तीन मित्र आणि लव्ह ट्रायंगवर आधारित राज कपूर यांच्या 'संगम' चा रीमेक हॉलिवूडमध्ये Pearl Harbour नावाने केला गेला. सिनेमांची कथा जवळपास सारखीच आहे. फक्त एक सिनेमा बॉलिवूडचा आहे तर दुसरा हॉलिवूडचा.
4 / 8
'मैनें प्या क्यों किया'चा रीमेक Just Go With It आहे. हॉलिवूडमध्ये या सिनेमाचा भरपूर पसंती मिळाली होती. २००५ मध्ये सलमान खान आणि सुष्मिता सेनच्या या सिनेमाचा रीमेक हॉलिवूडमध्ये २०११ मध्ये केला गेला. हा सिनेमाही ट्रू कॉपी आहे.
5 / 8
नसीरूद्दीन शाह यांच्या 'ए वेडनेस डे' चा रीमेक आहे A common Man नावाने बनवला होता. नीरज पांडेच्या या सिनेमाचा रीमेक हॉलिवूडमध्ये २०१३ मध्ये बनवला होता. या सिनेमातील नसीरूद्दीन शाहची भूमिका अकॅडमी अवॉर्ड विनर बेन किंग्सले यानी साकारली होती.
6 / 8
करीना कपूर आणि शाहीद कपूर यांच्या 'जब वी मेट' सिनेमाने हॉलिवूड इन्स्पायर झालं होतं. या सिनेमाचा हॉलिवूड रीमेक Leap Year नावाने केला होता. हॉलिवूडमध्ये या सिनेमाला खूप पसंती मिळाली होती.
7 / 8
बॉलिवूड सायको थ्रीलर सिनेमा 'डर' चा रीमेक हॉलिवूडमध्ये Fear नावाने बनवण्यात आला होता. शाहरूख खानच्या या १९९३ मध्ये आलेल्या डर सिनेमाचा रीमेक १९९६ मध्ये हॉलिवूडमध्ये बनवला गेला. हा सिनेमाही बॉलिवूडची ट्रू कॉपी आहे.
8 / 8
'विक्की डोनर' सिनेमाचा रीमेक हॉलिवूडमध्ये Delivery Man नावाने करण्यात आला होता. आयुष्यमान खुराणाच्या या सिनेमाचा विषय खूप वेगळा होता. ही थीम हॉलिवूडमध्ये खूप पसंत केली गेली.
टॅग्स :बॉलिवूडहॉलिवूड