Join us

2019 मध्ये भारतात बॉलिवूड नाही तर 'या' हॉलिवूड सिनेमांनी केली सर्वात जास्त कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 4:56 PM

1 / 11
२०१९मध्ये भारतीय चित्रपटांबरोबरच हॉलिवूडपटांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आज आपण यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या इंग्रजी चित्रपटांची माहिती घेणार आहोत.
2 / 11
'अॅव्हेंजर्स एंडगेम' हा चित्रपट इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या आणि भव्यदिव्य चित्रपटांपैकी एक होता.
3 / 11
या चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल ३३ सुपरहिरोंची फौज पाहायला मिळते. अॅव्हेंजर्सने भारतात तब्बल ३५० कोटी रुपयांची कमाई केली. भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूडपटांच्या यादीत 'अॅव्हेंजर्स एंडगेम' पहिल्या क्रमांकावर आहे.
4 / 11
'स्पायडरमॅन' हा भारतातील सर्वात आवडता सुपरहिरो आहे. त्याच्या कार्टून सीरिजदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात.
5 / 11
स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम' या चित्रपटानेही भारतात तुफान कमाई केली इंग्रजी बरोबरच हिंदी, तामिळ आणि तेलुगु या प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल २०४ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली.
6 / 11
'लायन किंग'ने १० दिवसांत १३६.८ कोटी रुपयांची कमाई केली.
7 / 11
हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या कार्टूनपटाचा रिमेक होता. हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता.
8 / 11
'कॅप्टन मार्व्हल' हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे.
9 / 11
या चित्रपटाने तब्बल १८४.२२ कोटी रुपयांची कमाई केली. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा चित्रपट चर्चेत होता.
10 / 11
जोकर - ऑक्टोंबरमध्ये प्रदर्शित झालेला 'जोकर' हा २०१९ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता.
11 / 11
या चित्रपटाने भारतात ५०.६५ कोटी रुपयांची कमाई केली. संपूर्ण देशात केवळ १६२ चित्रपट गृहांमध्येच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तरीही हा जोकर सुपरहिट ठरला.
टॅग्स :हॉलिवूडद लायन किंगअ‍ॅवेंजर्स- एंडगेम