Join us

'या' सुंदरीनं बिलबोर्डच्या टॉप १०० महिला कलाकाराच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:58 IST

1 / 10
२१ व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षात अनेक महिला कलाकारांनी बिलबोर्डच्या चार्टवर गौरवपूर्ण विक्रम नोंदवले आहेत. बिलबोर्ड २०० अल्बम चार्ट आणि बिलबोर्ड हॉट १०० गाण्यांच्या चार्टवरील कामगिरीच्या आधारे २१ व्या शतकातील १०० टॉप महिला कलाकारांची यादी जाहीर केली आहे. यात पहिलं स्थान टेलर स्विफ्टने (Taylor Swift) पटकावलं आहे.
2 / 10
टेलर स्विफ्टने पहिलं स्थान पटकावत रिहाना आणि बेयॉन्से या दोघींनाही मागे टाकलं आहे.
3 / 10
हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री रिहाना ही दुसऱ्या स्थानी आहे. तिनं २००५-१६ मध्ये तिने आठ स्टुडिओ अल्बम रिलीज केले होते आणि तिचे आठही स्टुडिओ कलेक्शन बिलबोर्ड २०० वर टॉप १० मध्ये पोहोचले होते.
4 / 10
तर तिसऱ्या स्थानी बेयॉन्से आहे. १९९० च्या दशकात बेयॉन्सेने तिच्या आर अँड बी करिअरची सुरुवात डेस्टिनीज चाइल्ड या ग्रुपमधून केली. पण काही काळानंतर तिने एक अल्बम काढला आणि ती सर्वांची आवडती बनली. २००३ च्या डेंजरसली इन लव्ह ते काउबॉय कार्टर पर्यंतचे तिचे आठही स्टुडिओ अल्बम बिलबोर्ड २०० वर पहिल्या क्रमांकावर होते.
5 / 10
तर चौथ्या स्थानी एडेल, पाचव्या स्थानी केटी पेरी, सहाव्या स्थानी लेडी गागा या आहेत. अशा १०० महिला कलाकारांची यादी आहे. ज्यांनी बिलबोर्डच्या चार्टवर गौरवपूर्ण विक्रम नोंदवले आहेत.
6 / 10
टेलर स्विफ्टबद्दल बोलायचं झालं तर तिने २००४ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आज ती जगातील टॉप गायिकांमध्ये येते.
7 / 10
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर तिचं नाव जगातील अब्जाधीशांमध्ये सामील आहे.
8 / 10
खूप लहानपणापासून तिनं यशाची चव चाखली; पण मुख्य म्हणजे या यशाची हवा कधीच तिच्या डोक्यात गेली नाही. ‘पाय जमिनीवर असलेली सेलिब्रिटी’ म्हणून आजही तिचं नाव घेतलं जातं.
9 / 10
टेलर स्विफ्ट ३५ वर्षांची आहे. तिचा जन्म १३ डिसेंबर १९८९ रोजी पेनसिल्व्हेनिया येथे झाला. तिचे नाव गायक जेम्स टेलरच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
10 / 10
टेलर स्विफ्टचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २८२ मिलियन फॉलोअर्स आहेत. चाहत्यांना तिची गाणी खूप आवडतात. भारतातही तिचे भरपूर फॅन्स आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीहॉलिवूडरिहाना