Join us

बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 1:34 PM

1 / 9
मनोरंजक्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना प्रोफेशनली खूप यश मिळालं आहे पण वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक वादळांचा सामना केला आहे. अशीच कहाणी आहे एका अशा अभिनेत्रीचे जिचे 1-2 नाही तर तब्बल 8 घटस्फोट झाले आहेत.
2 / 9
अभिनेत्रीच्या या 8 लग्नांच्या गोष्टीत एक गँग्सटर बॉयफ्रेंडही होता. ज्याची अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलीने चक्क हत्याच केली. अशी अजब गजब कहाणी असलेली ही अभिनेत्री कोण?
3 / 9
ही अभिनेत्री आहे हॉलिवूड स्टार लारा टर्नर (Lara Turner). लाराने 15 व्या वर्षीच करिअरला सुरुवात केली होती. तिला पहिल्याच सिनेमापासून लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. १९४० पर्यंत ती हॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली.
4 / 9
लारा टर्नर 35 वर्षांची झाली तोवर तिचे 4 घटस्फोट झाले होते. चौथा पती लेक्स बार्करसोबत घटस्फोट पूर्ण झाल्यानंतर ती अतिशय भयानक रिलेशनशिपमध्ये अडकली. गँगस्टर जॉनी स्टॉम्पानाटोसोबत तिचं अफेअर होतं.
5 / 9
26 मार्च 1958 रोजी ऑस्करमध्ये भाग घेतल्यनंतर गँगस्टर जॉनीने लारावर शारिरीक हल्ला केला. या घटनेच्या एका आठवड्यानंतर दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. तेव्हा जॉनीने टर्नरला, तिच्या आईला आणि मुलीला मारण्याची धमकी दिली. लाराची मुलगी चेरिल बाजूच्या खोलीतून हे ऐकत होती. ती घाबरली आणि तिने किचनमधून चाकू घेतला आणि जॉनीवर हल्ला केला.
6 / 9
या घटनेत जॉनीचा मृत्यू झाला. नंतर सेल्फ डिफेंसच्या युक्तिवादावर आणि ऑस्करमधील हल्ल्याचा पुरावा लक्षात घेऊन चेरिलला शिक्षा झाली नाही.
7 / 9
यानंतर लारा पुन्हा सिनेमांमध्ये सक्रीय झाली. 'इमिटेशन ऑफ लाईफ' या सिनेमासाठी तिने मानधन न घेता सिनेमाच्या नफ्यामध्ये 50 टक्के शेअर मागितला. काहीच दिवसात ती इंडस्ट्रीतील सर्वात जास्त कमाई करणारी स्टार बनली होती.
8 / 9
१९६६ साली तिने 'मॅडम एक्स' सिनेमा केला आणि ती निवृत्त झाली. १९६० ते १९७२ या काळात तिने लग्न केले. जेव्हा ती 51 वर्षांची होती तोपर्यंत तिचे 7 लग्न आणि घटस्फोट झाले होते.
9 / 9
९० च्या दशकापर्यंत ती आयुष्य जगली. 1995 साली तिचा कर्करोगाने मृत्यू झाला. ७ लग्न करुनही तिला चेरिल ही केवळ एकच मुलगी होती. चेरिल ही लाराच्या दुसऱ्या पतीची मुलगी आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीलग्नघटस्फोट