‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप By रूपाली मुधोळकर | Published: December 14, 2020 12:05 PM1 / 9हॉलिवूड सुपरस्टार अँजेलिना जोलीसारखे दिसायचे म्हणून चेह-यावर अनेक शस्त्रक्रिया करणारी आणि यानंतर अँजेलिनाची ‘झोम्बी’ अर्थात अँजेलिनाचे भूत म्हणून ओळखली जाणारी इराणची सहर तबार हिला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.2 / 9सहरवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ईशनिंदा, गैरमार्गाने पैसे कमावणे शिवाय तरूणाईला भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.3 / 9यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तिला सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कारवायांसाठी अटक करण्यात आली होती. आता तिला 10 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.4 / 9काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी 50 हून अधिक सर्जरी केलेल्या 19 वर्षीय तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हीच ती सहर तबार.5 / 9अँजेलिना जोलीसारखे दिसण्याचा नादात सहरचा चेहरा विद्रूप झाल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड चर्चा सुरु होती.मात्र कालांतराने प्लास्टिक सर्जरी फसल्याने चर्चेत आलेल्या या तरुणीने सर्जरी केलीच नसल्याचे समोर आले होते.6 / 9आपण मनोरंजनासाठी हा टाईमपास केल्याचा दावा खुद्द सहरने केला होता. मीमेक-अप आणि फोटोशॉपचा वापर करत हे फोटो तयार केले होते. स्वत:चे मनोरंजन करण्याच्या हेतूने आपण हे फोटो पोस्ट केल्याचा दावा तिने केला होता.7 / 98 / 9 मी जेव्हा फोटो पोस्ट केला तेव्हा त्याला अधिक हास्यास्पद आणि मजेदार करण्याच्या दृष्टीने मी तो एडिट केला. हे स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम असून, हे एक आर्ट आहे, असे सहर म्हणाली होता.9 / 9आपल्या इन्साग्राम फॉलोअर्सना आपला खरा चेहरा माहिती असल्याचा दावाही तिने केला होता. यानंतर सहरचे खरे फोटोही व्हायरल झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications