Join us

Kim Kardashian ने सांगितलं घटस्फोट घेण्याचं कारण, कुणामुळे केवळ सहा वर्षात मोडला संसार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 1:07 PM

1 / 11
मॉडल आणि टीव्ही स्टार Kim Kardashian आणि रॅपर केन वेस्ट ही जोडी प्रसिद्ध आहे. सहा वर्षे संसार केल्यानंतर ही जोडी आता वेगळी होत आहे. किमने पती केनसोबत घटस्फोटाची घोषणा काही महिन्यांआधीच केली होती. आता तिने हा निर्णय का घेतला याचं कारण सांगितलं आहे.
2 / 11
किम आणि तिच्या परिवारावर तयार झालेल्या Keeping Up with the Kardashians च्या फायनल एपिसोडमध्ये तिने घटस्फोटाच्या कारणाबाबत सांगितलं आहे. २० सीझन चाललेल्या या शोमध्ये किम, तिची आई आणि तिच्या बहिणींचं खरं आयुष्य लोकांना बघायला मिळालं. आता हा शो संपला आहे.
3 / 11
या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये किम आपल्या लग्नाबाबत तिच्या आईसोबत बोलताना दिसली. किम म्हणाली की, 'मी लोकांकडे माझ्या समस्यांचं उत्तर मिळवण्यासाठी जात होते. हे फार थकवणारं आहे. मी असा विचार करत होते की, मी एक वयस्क व्यक्ती आहे. मला स्वत:वर काम करू द्या आणि बघू द्या की मी कुठे आहे'.
4 / 11
किमनुसार, ती आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ आनंद मिळण्यासाठी धडपडत राहिली. ती म्हणाली, 'मी आज जे काही मिळवलं त्यासाठी खूप मेहनत केली. मी माझ्या अपेक्षांवर खरी उरतली आहे. जे मला मिळवायचं होतं ते मी मिळवलं आहे. पण माझ्याकडे त्याच्यासोबत शेअर करण्यासाठी आयुष्य नाही. मी हाच विचार करू का की, मला यात एकटेपणा वाटतो. मला वाटत होतं की, मी एकटी नाहीये. माझ्याकडे माझी मुलं आहेत'.
5 / 11
रॅपर केन वेस्ट बऱ्याच महिन्यांपासून किम आणि आपल्या मुलांना सोडून दुसऱ्या ठिकाणी राहतोय. याचा किमवर वाईट प्रभाव झाला. याबाबत किम म्हणाली की, 'माझा पती एका शहरातून दुसऱ्या शहरात येत-जात राहतो. मी फक्त या प्रवासात त्याच्यासोबत आहे आणि मला यात काहीच अडचण नव्हती. पण यावर्षी ४० वय पार केल्यानंतर मला जाणीव झाली की, माझी इच्छा नव्हती की, माझा पती माझ्यापासून दूर वेगळ्या शहरात रहावा'.
6 / 11
किमने हे मान्य केलं की, जेव्हा ती आणि केन वेगवेगळे राहत होते तेव्हा त्यांचं नातं चांगलं होतं. पण तिला तिच्या पार्टनरकडून ही अपेक्षा नाही. ती म्हणाली की, 'मला वाटतं की, आम्हाला एकसारखे शो पसंत असावेत. कुणी असं असावं जो माझ्यासोबत वर्कआउट करेल. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. पण जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी माझ्याकडे नाहीत'.
7 / 11
ती म्हणाली की, 'माझ्या ती प्रत्येक गोष्टी आहे ज्याचे लोक स्वप्न पाहतात. मला आलेल्या अनुभवांसाठी मी आनंदी आहे. पण मी छोट्या अनुभवांसाठीही तयार आहे. जे माझ्यासाठी महत्वाचे आहेत'.
8 / 11
किमची आई क्रिस जेनर मुलीला दिलासा देत म्हणाली की, 'मला तुला आनंदी बघायचं आहे. मी बऱ्याच दिवसांपासून तुला आनंदी बघितलं नाहीये'. क्रिसने किमबाबत सांगितलं की, 'माझं मन अशा गोष्टींमुळे तुटतं. कारण मला तिला आणि तिच्या मुलांना आनंदी बघायचं आहे. मला वाटतं की, तिने जगातल्या बेस्ट रिलेशनशिपमध्ये रहावं. तिला चार सुंदर मुले आहेत आणि मला वाटतं त्यांनी आनंदी रहावं'.
9 / 11
किम म्हणाली की, 'मी या सर्व गोष्टींमुळे थकले आहेत. मला नाही वाटत की, मी कधी आनंदी राहू शकेन. पण हे लक्षात ठेवायचं आहे की, मी आयुष्यात इथपर्यंत यासाठी नाही आले की, मी आनंदी राहू नये'.
10 / 11
दरम्यान, किम आणि केन वेस्टने २०१४ मध्ये लग्न केलं होतं. सहा वर्षाच्या या लग्नात त्यांना चार मुले झालीत. किमने फेब्रुवारी २०२१ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
11 / 11
टॅग्स :किम कार्देशियनहॉलिवूडघटस्फोट