Join us

Oscars 2022 : सेक्स अ‍ॅडिक्शन, मद्यसेवन..., ‘ऑस्कर’ गाजवणाऱ्या विल स्मिथचं असं होतं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 3:11 PM

1 / 10
यंदाच्या ऑस्कर मध्ये असं काही घडलं की, बघणारेही हैराण झालेत. होय, सोहळा सुरू असतानाच अभिनेता विल स्मिथ ऑस्कर घेण्यासाठी मंचावर आला आणि यावेळी घडू नये ते घडलं. होय, विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या थोबाडीत मारली.
2 / 10
विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला. पण हा पुरस्कार मिळण्याआधीच विल स्मिथचं क्रिस रॉकसोबत जोरदार भांडण झालं. क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट हिच्या केसांवरून जोक केला. यामुळेच विल स्मिथ भडकला. त्याने स्टेजवर क्रिसच्या थोबाडीत मारली.
3 / 10
ऑस्कर च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. थेट स्टेजवर हाणामारीच्या या घटनेची लगेच हेडलाईन झाली. अर्थात विल स्मिथ याआधीही अशा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. आज याच विल विल स्मिथ बद्दल आम्ही सांगणार आहोत.
4 / 10
विल स्मिथचे खरे नाव विलार्ड कॅरोल स्मिथ आहे दुसरा . 25 सप्टेंबर 1968 रोजी जन्मलेला विल स्मिथ एक अभिनेता तसेच रॅपर आणि चित्रपट निर्माता आहे. विल त्याचा टीव्ही शो द फ्रेश प्रिंस ऑफ बेल एयरमुळे लोकप्रिय झाला आहे.
5 / 10
विल स्मिथ त्याच्या अली, द मेन इन ब्लॅक फ्रेंचायझी, द पर्स्युट ऑफ हॅपीनेस, हॅनकॉक आणि किंग रिचर्ड या चित्रपटांमधून अधिक प्रसिद्धीस आला आहे. याशिवाय विलने सुसाइड स्क्वाड आणि अलादीन या चित्रपटातदेखील काम केलं होतं. अलादीनच्या जिनीच्या भूमिकेत विल दिसला होता आणि त्याची भूमिका सर्वांना खूप आवडली होती.
6 / 10
विल स्मिथ व त्याची बायको जेडा पिंकेट यांचं नातं किती अतूट आहे, याची झलक तुम्ही आज ऑस्कर सोहळ्यात पाहिलीच. हे दोघे अनेकदा आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसले. ते जे काही बोलले ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
7 / 10
एका मुलाखतीत हे कपल बोललं होतं. विल म्हणाला होता की, ‘90 च्या दशकात आमची भेट झाली तेव्हा आमचं नातं पूर्णपणे सेक्शुअल होतं. सुरूवातीला चार पाच महिने आम्ही दिवसभर मद्य प्यायचो आणि सेक्स करायचो. या मुलीला मी समाधानं करेल किंवा मग प्रयत्न करता करता मरेल, अशी माझी त्यावेळी भावना होती.’
8 / 10
‘मी इतक्या महिलांसोबत सेक्स केलं आहे की मला सायकोसोमेटिक विकार झाला होता. यामुळे मला ओकारी यायची,’असंही विल एका मुलाखतीत म्हणाला होता.
9 / 10
विल व जेडा यांंनी लग्नानंतर ब्रेकही घेतला होता. काही काळासाठी दोघंही वेगळे झाले होते. यावेळी जेडा एका सिंगरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण पुढे जेडा व विल स्मिथ पुन्हा एकत्र आलेत. एकंदर काय तर विल स्मिथ व जेडा दोघांनीही पर्सनल लाईफमध्ये जे केलं, ते सगळं जगासोबत शेअर केलं. त्यांनी काहीही लपवलं नाही.
10 / 10
विल स्मिथची पत्नी जेडा ही अभिनेत्री आणि गायिका आहे. तिला अलोपेसिया हा आजार आहे. यामुळे तिच्या डोक्यावरचे केस गळून टक्कल पडलं आहे. 2018 मध्ये तिने या आजाराचा खुलासा केला होता.
टॅग्स :ऑस्करहॉलिवूड