ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे स्पर्म डोनरच्या शोधात, तिनेच सांगितलं याचं कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 11:08 AM1 / 7Lala Kent plans sperm donor baby: फेमस अमेरिकन सेलिब्रेटी आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार लेले केंटने स्पर्म डोनरच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. पार्टनर एम्मेटपासून वेगळी झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतल्याची माहिती फॅन्सना दिली. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, ती आयव्हीएफऐवजी स्पर्म डोनरच्या माध्यमातून बाळाला जन्म देऊ शकते.2 / 732 वर्षीय सुपरस्टार आधीच एका मुलीची आई आहे. तेव्हाही तिने तिच्या पार्टनरसोबत केलेलं फॅमिली प्लॅनिंग लपवलं नव्हतं. यावेळीही तिने कुणापासून काही लपवलं नाही की, ती एखाद्या पुरूषाकडून नाही तर स्पर्म डोनरच्या मदतीने बाळाला जन्म देईल. 3 / 7एका मुलीची आई आणि पॉप्युलर टीव्ही अभिनेत्री केंटने पुढील वर्षी बाळाला जन्म देण्यासाठी स्पर्म डोनरचा शोध सुरू केला आहे. केंट म्हणाली की, माझ्या पार्टनरने मला दगा दिला. त्यामुळे मी पुन्हा एखाद्या पुरूषासोबत रिस्क घेऊ शकत नाही. मला एक मुलगी आहे. तिला मी खूप प्रेम देणार. नवीन बाळ आता स्पर्म डोनरच्या मदतीने येणार.4 / 7साल्ट लेक सिटीमध्ये राहणाऱ्या लेले केंटचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत. तिच्या या मुलाखतीनंतर तिच्या पोस्टला नेटिझन्स आणखी जास्त समर्थन देत आहेत.5 / 7केंटने सांगितलं की, माझ्या आयुष्यात आधी जे काही झालं आहे त्यामुळे मी खूप घाबरलेली आहे. त्यामुळे मी सध्या कोणत्या नव्या पुरूषासोबत नातं जोडणार नाही.6 / 7लेलेने पुढील उन्हाळ्यात बाळाला या जगात आणण्याचा विचार केला आहे. लेलेने आधी 51 वर्षीय प्रोड्यूसरसोबत लग्न केलं होतं. पण काही महिन्यांनी काही वादामुळे त्यांचं लग्न मोडलं होतं.7 / 7लेले टीव्ही शो सोबतच मॉडलिंगही करते. काही मोठ्या कंपन्यांच्या ती जाहिरातीही करते. लेलेचे फॅन्स तिच्या प्रत्येक पोस्टला फॉलो करतात. तिच्याबाबत असंही म्हटलं जातं की, कोणताही गॉडफादर नसताना तिने तिच्या मेहनतीने या विश्वास आपलं स्थान निर्माण केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications