Oscars विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:51 PM1 / 1096th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ९६व्या अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.2 / 10ऑस्कर २०२४मध्ये ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. ओपनहायमरनं सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सात पुरस्कार जिंकले3 / 10सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी, सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्यु, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, ओरिजनल स्कोअर, फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी असे पुरस्कार ओपनहायमरनं जिंकले आहेत. 4 / 10तर यंदाच्या ऑस्करमध्ये इमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. 'पुअर थिंग्ज'मधील अभिनयासाठी इमा स्टोनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ऑस्करविषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात..5 / 10 ऑस्कर समारंभाचे अधिकृत नाव 'अकादमी अवॉर्ड्स ऑफ मेरिट' असं आहे. तर अकादमी पुरस्कार हा सुमारे 24 श्रेणींमध्ये दिला जातो.6 / 10 अकादमी पुरस्कार हा 'अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'च्या सदस्यांद्वारे प्रदान केला जातो.7 / 10 पहिला अकादमी पुरस्कार हा 1929 मध्ये देण्यात आला होता. 16 मे 1929 रोजी लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये आयोजित केला होता.8 / 10ऑस्कर सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार' हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. 9 / 10 सर्वाधिक ऑस्कर जिंकण्याचा विक्रम वॉल्ट डिस्नेच्या नावावर आहे. ज्यांना 59 वेळा नामांकन मिळालं आणि 26 वेळा जिंकण्यात यश आलं.10 / 10 ऑस्कर पुरस्काराची प्रत्येक ट्रॉफी बनवण्यासाठी सुमारे 500 डॉलर्स खर्च येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications