Join us

रिहानाने डिलिव्हरी रूमचे फोटो केले शेअर, गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:44 IST

1 / 12
पॉप संगीताच्या जगतात सर्वात मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे रिहाना (Rihanna). ३७ वर्षीय रिहाना पॉप-सिंगर आहे.
2 / 12
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. या माध्यमातून ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते आणि चाहत्यांच्या संपर्कात राहते. आताही तिनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
3 / 12
रिहाना हिने नुकतंच तिचे डिलिव्हरी रूममधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिहाना तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसत आहे. हे फोटो तिने महिला दिनाच्या निमित्ताने पोस्ट केलेत.
4 / 12
फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'एक स्त्री म्हणून मी केलेली सर्वात शक्तिशाली गोष्ट, माझे छोटे चमत्कार!'. या फोटोत दिसणाऱ्या तिच्या बाळाचं नाव आहे 'RZA' असं आहे. या फोटोत तिच्या गळ्यात मोत्यांच्या माळा दिसून येत आहेत.
5 / 12
तर या फोटोत रिहानाच्या कुशीत असलेल्या बाळाचं नाव Riot Rose असं आहे. यावेळी रिहाना सनग्लासेस घालून पोझ देताना दिसतेय.
6 / 12
हे दोन्ही फोटो पोस्ट (Rihanna Shares Throwback Photo )करत तिनं म्हटलं, 'हो, मी मोत्यांच्या माळा आणि चष्मा घालूनच बाळांना जन्म दिला, आता का विचारू नका, खूप काही घडतंय'
7 / 12
माहितीनुसार, रिहानाने मे २०२२ मध्ये (Gave birth RZA in 2022) तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. यानंतर, ऑगस्ट २०२३ मध्ये (Gave birth RZA in 2022 in 2023) तिने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
8 / 12
रिहाना गेल्या अनेक वर्षापासून रॅपर रॉकीसोबत (A$AP Rocky) रिलेशनशिपमध्ये आहे. रिहाना आणि रॉकी हे दोन्ही मुलांचे पालक आहेत. पण, दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही किंंवा तशी घोषणाही केलेली नाही. पण, एका कार्यक्रमात त्याने रिहानाचा उल्लेख बायको म्हणून केला होता. येत्या काळात ही जोडी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
9 / 12
रिहानाचं मुळ नाव रॉबिन रिहाना फेंटी. बार्बाडोस या कॅरिबिनय बेटांमधल्या देशात तिचा जन्म झाला आणि ती तिथेच लहानाची मोठी झाली.
10 / 12
रिहाना वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी अब्जाधीश झाली होती. रिहाना एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. ती फक्त म्युझिकमधून नाही, तर व्यवसायातून मोठी कमाई करते.
11 / 12
रिहानाची ब्यूटी कंपनी 'फेंटी ब्युटी कॉस्मेटिक्स' मध्ये ५० वेगवेगळ्या स्किन टोनसाठी अनेक प्रोडक्ट्स आहेत. ब्यूटी प्रोडक्सशिवाय रिहानाची 'सेवेज एक्स फेंटी कंपनी' ही अंतर्वस्त्र कंपनी देखील आहे. रिहाना तिच्या कंपन्यां, म्युझिक इंडस्ट्रीशिवाय ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही मोठी कमाई करते.
12 / 12
टाईम मॅगझीनने जगातल्या १०० सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत रिहानाचा समावेश दोनदा म्हणजेच २०१२ आणि २०१८ साली केला होता.
टॅग्स :रिहानाहॉलिवूडसेलिब्रिटी