Join us

PHOTOS : मोदी सरकारला आव्हान देणारी आणि कंगनाला ‘ताप’ देणारी रिहाना आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:00 PM

1 / 12
पॉप स्टार रिहाना दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतक-यांबद्दल बोलली आणि संपूर्ण जगात तिच्या नावाची चर्चा सुरु झाली.
2 / 12
भारतातील शेतकरी आंदोलनाचा फोटो ट्विट करत, आपण याबद्दल का बोलत नाहीये? असा सवाल रिहानाने केला आणि तिच्या या ट्विटची भलतीच चर्चा सुरु झाली.
3 / 12
रिहानाच्या ट्विटने कंगना राणौतलाही संताप आणला. आता कंगनाला ताप देणारी ही रिहाना आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
4 / 12
तर या रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख.
5 / 12
ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे.
6 / 12
वय आहे उणेपुरे 32. पण या वयात तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
7 / 12
रिहाना 14 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईवडीलांचा घटस्फोट झाला. याचा रिहानाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.
8 / 12
15 व्या वर्षी ती प्रोड्यूसर इवान रोजर्स यांच्याकडे ऑडिशनला पोहाचली. तोच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
9 / 12
यानंतर ती रोजर्स व त्यांच्या पत्नीसोबत राहू लागली आणि एकापाठोपाठ एक तिचे 4 गाणे शूट झाले. मग काय रिहाना एका रात्रीत स्टार बनली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
10 / 12
2005 मध्ये रिहानाने ‘म्युझिक ऑफ द सन’ हा तिचा पहिला स्टुडिओ अल्बम तुफान गाजला. अगदी बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला होता.
11 / 12
2006 मध्ये रिहानाने ‘ए गर्ल लाइक मी’ या तिच्या दुस-या अल्बमनेही धूम केली. बॅटलशिप आणि ओसियन 8 यासारख्या हॉलिवूडपटात तिने कामही केले.
12 / 12
रिहाना अनेकदा सामाजिक मुद्यांवर बोलताना दिसते. असते. ट्रम्प सरकाराने घेतलेल्या इमिग्रेशन संदभार्तील निर्णयावरही तिने टीका केली होती.
टॅग्स :कंगना राणौतशेतकरी संप