‘मिस्टर बीन’ कंटाळला! रोवन एटकिंसन आता कधीच साकारणार नाही ही भूमिका, वाचा कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 2:55 PM1 / 11‘मिस्टर बीन’ हे दोन शब्द उच्चारले तरी समोर येतो रोवन एटकिंसन या अभिनेत्याचा चेहरा . अगदी त्यांचा चेहरा आठवला तरी चेहºयावर हसू येतं. ‘मिस्टर बीन’ हा नव्वदीच्या दशकातला त्यांचा शो प्रचंड गाजला.2 / 11मात्र आता रोवन कधीही ‘मिस्टर बीन’च्या भूमिकेत दिसणार नाही. एका मुलाखतीत त्याने स्वत: ही माहिती दिली.3 / 11मी यानंतर पुढे कधीही ‘मिस्टर बीन’ची भूमिका साकारणार नाही. ‘मिस्टर बीन’वर आधारित अॅनिमेटेड सीरिजला मी आपला आवाज देईल. पण मी स्वत: ‘मिस्टर बीन’च्या भूमिकेत दिसणार नाही, असे तो म्हणाला.4 / 11याचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर रोवनच्या मते, ही भूमिका साकारताना आता मला मजा येत नाही.5 / 11‘मला आताश: ही भूमिका साकारताना मजा येत नाही. ही भूमिका साकारताना अंगावर खूप मोठी जबाबदारी असते. जी निभवणे खूप कठीण असते. मिस्टर बीन साकारणे खूप तणावाचे आणि थकवणारे असते. त्यामुळे यापुढे ही भूमिका न साकारण्याचा निर्णय मी घेतला आहे,’ असे त्याने सांगितले.6 / 111990 साली मिस्टर बीन हे कॅरेक्टर पहिल्यांदा टीव्हीवर दिसले होते. यानंतर हे पात्र जगभर कमालीचे लोकप्रिय झाले.7 / 11मिस्टर बीनचे फेसबुक पेज जगभरात सर्वाधिक लाईक मिळवणारे 10 वे पेज आहे, यावरून या पात्राच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण लावू शकतो.8 / 11मिस्टर बीन हा शो सलग पाच वर्ष चालला आणि लोकप्रियतेच्या उंच शिखरावर पोहोचला. टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेल्या शोंपैकी हा एक शो ठरला. रोवनला या शोमधून लोकप्रियता तर मिळालीच सोबतच भरपूर पैसाही मिळाला. मिस्टर बीन हीच त्याची ओळख झाली.9 / 11रोवनचा जन्म अमेरिकेतील डरहम मधील. त्याचेवडील शेतकरी होते. पण रोवनची स्वप्ने वेगळीच होती. रोवन आज 64वर्षांचा असून त्याला तीन मुले आहेत. रोवनच्या अभिनयाकरिता ब्रिटिनच्या महाराणीने त्याचा विशेष गौरव केला होता. 10 / 11मिस्टर बीन आठ हजार करोड संपत्तीचामालक असून त्याचे नाव ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतले जाते.त्याचे स्टारडम हे हॉलिवूडमधील मोठ्या अॅक्टर पेक्षाही जास्त आहे. लंडनमध्ये त्याचा आलिशान महाल असून याची किंमत अब्जो रुपये आहे. 11 / 11रोवनकडे जगातील सर्वात महागड्या कार्सचं कलेक्शन आहे. रोल्स रॉयस, एस्टोन मार्टिन डीबी2, बीएमडब्लू 328, आणि एक्यूरा, एनएसएक्स अशा कार त्यांच्याकडे आहेत. मैकलोरेन एफ1 ही सर्वात महागडी कार असून याची किंमत अंदाजे 80 ते 100 कोटी इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications