Shocking Revelation: "पहाटे रूममध्ये बोलवून तो मला टेबलावर झोपवायचा अन्..."; अभिनेत्रीने सांगितला शाळेतील धक्कादायक अनुभव By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 10:04 PM1 / 6Paris Hilton Shocking Revelations: हॉलिवूड अभिनेत्री पॅरिस हिल्टन हिने तिच्या शाळेबद्दल मोठा खुलासा केला आहे. अमेरिकेतील उटाह येथील प्रोवो कॅनियन शाळेत शिकत असताना तिचे लैंगिक शोषण झाल्याचे पॅरिसने सांगितले केले आहे. मुलींचे शोषण शाळेतील कर्मचार्यांनीच केल्याचा धक्कादायक आरोप तिने केला होता. पॅरिस हिल्टनच्या म्हणण्यानुसार, शाळेतील कर्मचारी तिची आणि इतर मुलींची जबरदस्तीने 'मेडिकल चेकअप' (cervical exams) करून शोषण करत असल्याचा दावा केला आहे.2 / 6पॅरिस हिल्टन १६ वर्षांची होती जेव्हा तिचे पालक कॅथी आणि रिक हिल्टन यांनी तिला प्रोव्हो कॅनियन स्कूल नावाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. तिने या शाळेत ११ महिने शिक्षण घेतले आणि त्यानंतर ती घरी परतली. तिथेच तिला लैंगिक शोषणाचा धक्कादायक व अंगावर काटा आणणारा प्रकार अनुभवावा लागला. 3 / 6पॅरिसने बोर्डिंग स्कूलमध्ये तिला आलेल्या वेदनादायक अनुभवाबद्दल आधीही सांगितले होते. २०२० मधील तिच्या डॉक्युमेंटरीमध्ये तिचे बालपण आणि अत्यंत क्लेशकारक अनुभवाबद्दल उघडपणे भाष्य करण्यात आले आहेत. त्यानंतर तिने नुकतीच एक मुलाखत दिली त्यात तिने तिच्यावरील प्रसंगाबद्दल सांगितले.4 / 6न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, पॅरिस हिल्टनने सांगितले की, 'सकाळी ३-४ वाजले होते, तेव्हा शाळेतील कर्मचारी मला आणि इतर मुलींना एका खोलीत घेऊन जायचे आणि आमची वैद्यकीय तपासणी करण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण करायचे. तेथे कोणीही डॉक्टर नसतानाही काही कर्मचारी आम्हाला टेबलावर झोपायला लावायचे आणि मग आमच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावायचे, असा आरोप तिने केला आहे.5 / 6मुलाखत देत असताना पॅरिस हिल्टनचा आवाज थरथर कापल्याचेही दिसले. कारण तिला ते भयानक क्षण आठवले. ती पुढे म्हणाली, 'ते कर्मचारी काय करत होते ते मला माहीत नाही. पण ते डॉक्टर नव्हते. ती घटना खूप भितीदायक होती. ही गोष्ट मी माझ्या मनात आणि हृदयात वर्षानुवर्षे दाबून ठेवली. पण आता मी मोठी झाल्यावर आणि मला हे आठवल्यावर कळतं की ते लैंगिक शोषण होते.'6 / 6ट्विटरवरही पॅरिस हिल्टनने तिच्यासोबत झालेल्या भीषण प्रसंगाविषयी लिहिले. तिने ट्विट केले की, 'मला टेबलावर झोपायला लावून माझी 'सर्विकल एग्जाम' करण्यास भाग पाडले गेले. त्यांनी मला पकडले तेव्हा मी रडले आणि नकार दिल्यावर तो मला म्हणाला- शट अप! तुझे तोंड बंद ठेव. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करणं थांबवा नाही तर...' असं तिला धमकावण्यात आले होते. पण अशा प्रकारचे शोषण संपवण्यासाठी मला याबद्दल बोलण्याची गरज आहे असे ती म्हणाली. आणखी वाचा Subscribe to Notifications