1 / 8नुकताच न्युयॉर्कमध्ये मेट गाला 2024 हा भव्यदिव्या फॅशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला जगभरातील अनेक मान्यवरांनी, सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.2 / 8या फॅशन इव्हेंटमध्ये उपस्थित मान्यवर कायम त्यांच्या डिझायनर ड्रेसमुळे चर्चेत येत असतात. यात आलिया, इशा अंबानी या दोघींनी उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर रोखून धरल्या होत्या. परंतु, सगळ्यात चर्चा रंगली ती हैदराबादच्या एका राणीची.3 / 8हैदराबादच्या राणीने मेट गालाच्या रेड कार्पेटवर एन्टी घेतली आणि सगळ्यांचे डोळे विस्फारले. कारण, त्यांनी तब्बल ८३ कोटींचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.4 / 8हैदराबादची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुद्धा रेड्डी यांचा संपूर्ण आऊटफिट आणि एकंदरीत लूक या सोहळ्यात चर्चेत राहिला.5 / 8सुद्धा रेड्डी यांनी आयवरी सिल्क गाऊन परिधान केला होता. याची किंमत ८३ कोटी रुपये होती. सोबतच त्यांनी १८० कॅरेट अमोरे एटर्नो’ हा हिऱ्यांचा हार घातला होता. यात प्रत्येक हिरा २५ कॅरेटचा होता.6 / 8सुद्धा रेड्डी यांनी २३ कॅरेट डायमंड सॉलिटेयर रिंग आणि आणखी एक २० कॅरेट डायमंड सॉलिटेयर रिंग घातली होती. याची किंमत २० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार, १६५ कोटी रुपये इतकी आहे.7 / 8सुधा रेड्डी या प्रसिद्ध बिझनेसमन मेघा कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी आहेत. त्यांनी हा डिझायनर गाऊन तरुण तहलियानी यांच्याकडून डिझाइन करुन घेतला होता.8 / 8सुधा रेड्डी यांचा हा गाऊन तयार करण्यासाठी ४५०० पेक्षा जास्त कालावधी लागला असून ८० पेक्षा जास्त कारागिरांनी तो हस्तीदंत आणि रेशमापासून तयार केला आहे.