Taylor Swift becomes world richest female musician with 160 crores USD net worth
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 8:29 PM1 / 10टेलर स्विफ्ट ही एक जगप्रसिद्ध हॉलीवूड म्यूजिशियन आहे. तिच्या गाण्यांसाठी ती जगभरात लोकप्रिय आहे. चाहत्यांना तिची गाणी खूप आवडतात. भारतातही तिचे भरपूर फॅन्स आहेत.2 / 10अलीकडेच फोर्ब्सने एक यादी जाहीर केली. त्यात टेलर स्विफ्ट ही अधिकृतपणे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार बनली आहे. तिच्याकडे असलेली संपत्ती भलेभल्यांचे डोळे पांढरे होतील.3 / 10टेलर स्विफ्टचा जन्म १३ डिसेंबर १९८९ रोजी पेनसिल्व्हेनिया येथे झाला. प्रसिद्ध गायक जेम्स टेलर यांच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आले.4 / 10टेलरने २००४ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर २०२३ मध्ये तिचे नाव जगातील अब्जाधीशांमध्ये सामील झाले.5 / 10टेलर स्विफ्ट हे संगीत जगतातील एक प्रसिद्ध नाव असून ती बरीच वर्षे कार्यरत आहे. फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार, टेलर स्विफ्टची एकूण संपत्ती तब्बल १.६ अब्ज अमेरिकन डॉलर्स ( 160 Crores USD ) इतकी आहे.6 / 10टेलर स्विफ्ट हिने आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या यादीत दुसरी असलेली रिहाना हिची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स आहे.7 / 10टेलर स्विफ्टच्या संपत्तीतील एक मोठा भाग म्हणजे अंदाजे ०.६ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न हे तिला विविध कॉन्सर्ट, दौरे आणि गाण्यांच्या रॉयल्टीमधून मिळतात.8 / 10याशिवाय आणखी ०.६ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न म्युझिक अल्बमच्या माध्यमातून मिळते, तर १.२ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न हे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून येते.9 / 10टेलर स्विफ्ट हे हॉलीवूडसह देशभरातील तरुणाईच्या परिचयाचे नाव आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणजे टेलरने २०२३ मध्ये फक्त Spotify स्ट्रीमिंगमधून ०.१ अब्ज डॉलर्सची रॉयल्टी मिळवली आहे.10 / 10टेलर स्विफ्टचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २८३ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे टेलर स्विफ्ट अनेक सोशल मीडियावरूनही बरेच उत्पन्न मिळवते. आणखी वाचा Subscribe to Notifications