Join us

कोरिअन ड्रामाचे चाहते आहात? मग 'हे' Top 10 Korean Drama नक्कीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 8:24 PM

1 / 11
गेल्या काही काळामध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्याचं पाहायला मिळत आहे. आजचा प्रेक्षकवर्ग ठराविक एका भाषेपूरता किंवा कलाकृतीपूरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे आज अन्य भाषिक चित्रपट, वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. यामध्येच सध्या कोरिअन ड्रामा, वेबसीरिज (Korean Drama)पाहण्याकडे प्रेक्षकांची ओढ वाढली आहे. म्हणूनच, जर तुम्ही देखील K-Drama चे फॅन असाल तर हे १० शो नक्कीच पाहा
2 / 11
When My Love Blooms - २०२० मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये एका कपलची कथा सांगण्यात आली आहे. युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडलेली ही जोडी तब्बल २० वर्षांनंतर एकमेकांना समोर येते. परंतु, यावेळी परिस्थिती बदलेली असते. यात सीरिजच्या नायिकेचं लग्न झालं असून तिला एक बाळदेखील असतं. इतकंच नाही तर तिच्यावर अनेक बंधनंदेखील असतात. तर, सीरिजचा नायक एक यशस्वी उद्योजक झालेला असतो.
3 / 11
Record of Youth - या सीरिजमध्ये तीन तरुणांची कथा सांगण्यात आली आहे. ऐन तारुण्यात या मुलांना मॉडलिंग क्षेत्रात नशीब आजमावायचं असतं त्यामुळे ते त्यासाठी कशा प्रकारे धडपड करतात याचं चित्रण या सीरिजमध्ये करण्यात आलं आहे. या सीरिजमध्ये Park Bo-gum, Park So-dam, Byeon Woo-seok आणि Kwon Soo-hyun हे कलाकार झळकले आहेत.
4 / 11
Do Do Sol Sol La La Sol - ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. विशेष म्हणजे कोविडमुळे या सीरिजची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. परंतु, उशीरा प्रदर्शित होऊनही ती लोकप्रिय ठरली. यात Go Ara, Lee Jae-wook आणि Kim Joo-hun यांच्या मुख्य भूमिका आहेत.
5 / 11
Start-Up - या सीरिजमध्ये Bae Suzy, Nam Joo-hyuk, Kim Seon-ho आणि Kang Han-na महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. या सीरिजची कथा एका महिलेभोवती फिरतांना दिसते. या महिलेला स्टीव्ह जॉब्सप्रमाणे एक Entrepreneur व्हायचं असतं. त्यासाठी ती प्रचंड प्रयत्न करत असते. आणि याच काळात सीरिजमध्ये एक लव्ह ट्रँगलदेखील होतो असं एकंदरीत दाखवण्यात आलं आहे.
6 / 11
Tale of the Nine-Tailed - ही सीरिज १६ भागांची आहे. यात Lee Dong-wook, Jo Bo-ah आणि Kim Bum या कलाकारांनी आपल्या अभियाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
7 / 11
Crash Landing On You - Lee Jeong-hyo दिग्दर्शित हा ड्रामा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला. कोरियासह अन्य देशातही या सीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दक्षिण कोरियातील एक उद्योजिका कशाप्रकारे उत्तर कोरियात जाते आणि तिची भेट तेथील एका आर्मी ऑफिसरसोबत होते हा प्रवास यात उत्तमरित्या मांडण्यात आला आहे. या सीरिजमध्ये Hyun Bin, Son Ye-jin, Kim Jung-hyun आणि Seo Ji-hye हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
8 / 11
Itaewon Class - द. कोरियातील गाजलेली वेबसीरिजमध्ये Itaewon Class . या सीरिजमध्ये Park Seo-joon, Kim Da-mi, Yoo Jae-myung, आणि Kwon Nara मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
9 / 11
It's Okay to Not Be Okay - Jo Yong यांची कथा असलेल्या या ड्रामाचं दिग्दर्शन Park Shin-wooI यांनी केलं आहे. It's Okay to Not Be Okay हा कोरिअन रोमॅण्टिक ड्रामा आहे. यात Kim Soo-hyun, Seo Yea-ji, Oh Jung-se आणि Park Gyu-youn यांच्या मुख्य भूमिका आहेत.
10 / 11
Memorist - Memorist ही वेबसीरिज सध्या तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. या सीरिजमध्ये Yoo Seung-ho, Lee Se-young आणि Jo Sung-ha यांनी मुख्य भूमिका साकाली आहे. यात Yoo Seung-ho हा डोंग बेक या मनोविकारतज्ज्ञाच्या भूमिकेत झळकला आहे. जो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्याच्या खास पद्धतीने पकडतो.
11 / 11
Hospital Playlist - गाजलेल्या K-Drama मध्ये Hospital Playlist चं नाव आवर्जुन घेतलं जातं. या शोची कथा Lee Woo-jung यांनी लिहिली असून त्याचं दिग्दर्शन Shin Won-ho ने केलं आहे. Prison Playbook (2017–18) नंतर आलेली ही Wise Life series ची दुसरी सीरिज आहे. यात Jo Jung-suk, Yoo Yeon-seok, Jung Kyung-ho, Kim Dae-myung आणि Jeon Mi-do हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.
टॅग्स :वेबसीरिजहॉलिवूडसेलिब्रिटी