सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्री कोण? कमाईत टॉम क्रूझला सोडलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:53 IST
1 / 11 टीव्ही हे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम आहे, यात दुमत नाही. टीव्ही शोमध्ये काम करणारे सेलिब्रिटी घराघरात पोहचतात. पण, या कलाकारांना मुव्ही स्टार्सपेक्षा कमी पैसे दिले जात होते. पण आता काळ बदलत चालाल आहे. आता टीव्ही स्टार्स हे टॉप फिल्म स्टार्सपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. 2 / 11याचे ताजे उदाहरण म्हणजे एक अभिनेत्री (Highest Paid TV Actress) आहे, जिनं कमाईच्या बाबतीत ए-लिस्ट स्टार टॉम क्रूझलाही मागे टाकले आहे.3 / 11 ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) हा जगातील सर्वात श्रीमंत मुव्ही स्टार आहे. ज्याचं वार्षिक उत्पन्न ८८ दशलक्ष डॉलर्स असल्याचं म्हटलं जातं आहे.4 / 11 तर सर्वात श्रीमंत मुव्ही स्टार निकोल किडमन आहे. जी ५७ वर्षांची असून तिचे वार्षिक उत्पन्न ३१ दशलक्ष डॉलर्स आहे. 5 / 11पण, तुम्हाला जगातील सर्वात महागडा टीव्ही स्टार कोण आहे हे माहित आहे का?6 / 11जगातील सर्वात महागडा टीव्ही सेलिब्रिटी हा पुरुष स्टार नसून ६१ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री मारिस्का हार्गीटे ही आहे.7 / 11 हो, फोर्ब्सच्या मते, मारिस्का ही २०२४ ची सर्वात महागडी अभिनेत्री आहे, जिने एका वर्षात सुमारे २५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २.४८ लाख कोटी रुपये कमावले आहेत. 8 / 11२०२४ च्या सर्वात महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत मारिस्का ११ व्या क्रमांकावर आहे.9 / 11तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मारिस्काने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या हॉलिवूड स्टार्सना मागे टाकले आहे. 10 / 11 टॉम क्रूझने १८ मिलियन डॉलर, जॉन सेना याने २३ मिलियन डॉलर, स्कारलेट जोहानसनने २१ मिलियन डॉलर, मॅट डेमनने २३ मिलियन डॉलर , जेसन स्टॅथमने २४ मिलियन डॉलर आणि जेक गिलेनहालने २२ मिलियन डॉलर कमाई केली होती. या सर्वांना तिनं मागे टाकलं आहे.11 / 11 मारिस्का हार्गिटे ही अमेरिकन टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या प्राइमटाइम ड्रामा 'लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट' मधील 'ऑलिव्हिया बेन्सन' या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. मारिस्का हार्गीटेनं १९८० च्या दशकात तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट' या शोमध्ये ती २६ वर्षांपासून काम करत आहे.