हनी सिंगनं एका महिन्यात घटवलं १७ किलो वजन, ट्रेनरनं सांगितलं वेट लॉस सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:01 IST
1 / 11पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगच्या (Honey Singh) गाण्यांची हटके स्टाइल आणि त्याच्या स्वॅगचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. 2 / 11हनी सिंग काही काळ इंडस्ट्रीमधून गायब झाला होता. आजारी असल्यानं त्यानं काही काळ विश्रांती घेतली होती. त्याला बायपोलर डिसऑर्डरसारख्या (Bipolar Disorder) गंभीर आजाराने ग्रासले होते. 3 / 11नेटफ्लिक्सनं बनवलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्याने आपल्या जीवनातल्या सात वर्षांच्या खडतर काळाबद्दल सविस्तर सांगितलंय. 4 / 11पण, हनी सिंगने आजारावर मात करत जोरदार कमबॅक केलं. पण, हनी सिंग जेव्हा परतला, तेव्हा त्याचं वजन (Weight) वाढलेलं होतं.5 / 11 कमबॅक केल्यानंतर हनी सिंगने फिट व्हावं, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. हनी सिंगने मेहनत घेतली आणि वजन कमी (Weight Loss) करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. हनी सिंगचं ट्रान्सफॉर्मेशन (Honey Singh Weight Loss Journey) पाहून त्याचे चाहते खूश आहेत. 6 / 11 हनी सिंगने एका महिन्यात तब्बल १७ किलो (Honey Singh Lost 17 Kilos In A Month) वजन घटवलं. त्याने ९४ किलोवरून ७७ किलोपर्यंत वजन वजन कसे कमी केले हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. त्याचा हा वेट लॉसचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.7 / 11 तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर हनी सिंने ज्या पदार्थांचा आणि ज्यूसचा वापर केला, त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. आज तकशी बोलताना हनी सिंगचा ट्रेनर अरुण कुमारनं रॅपरच्या वेट लॉसविषयी सांगितलं8 / 11अरुण कुमारने सांगितलं की, पोषक तत्वांनी समृद्ध असलेलं 'ग्रीन ज्यूस' (Honey Singh’s Weight Loss Green Juice) हनी सिंग घेत होता. त्या ज्यूसमुळं शरीर डिटॉक्सीफाई करण्यास आणि मेटाबॉलिज्म वाढविण्यास मदत झाली. रिकाम्या पोटी हे ज्यूस घेतल्यानं शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि वजन कमी होण्यास गती मिळते, असं त्यानं सांगितलं. 9 / 11बीट, आवळा, काकडी, गाजर, कोथिंबीरची पाने यांचं ज्यूस हनी सिंग घेत होता. बीट हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतं. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे पचन व्यवस्थित होतं आणि चरबी कमी करण्यास मदत करते. तर काकडी शरीराला हायड्रेट करते आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. गाजरामुळे पचनप्रकिया सुधारते. तसेच त्यातून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. यासोबतच कोथिंबीरची पानांमुळे पचन आणि चयापचय क्रिया व्यवस्थित राहते.10 / 11अरुण कुमारनं हनी सिंगच्या डायट प्लॅनबद्दल (Honey Singh Diet) सांगितलं. तो म्हणाला, सकाळच्या जेवणात ग्रीन ज्यूस, ब्लेंडेड वेजिटेबल्स आणि फायबरचा समावेश करण्यात आला होता. तर दुपारचे जेवणात उकडलेले चिकन आणि भात, तर सायंकाळी भाज्यांचं सूप किंवा उकडलेलं चिकन आणि रात्रीच्या जेवणात शरीराला फायबर आणि आवश्यक पोषण प्रदान करणारं हिरव्या भाज्याचं सूपचा समावेश होता. तर प्रोसेस्ड फूड, साखर आणि अल्कोहोल हे पुर्णपणे बंद करण्यात आलं.11 / 11 निरोगी आहारासोबतच व्यायामालाही (Honey Singh Workout Routine) भरपूर वेळ देण्यात आला होता. हनी सिंगने कधीही त्याचं वर्कआऊट सेशन चुकवलं नसल्याचं ट्रेनरने सांगितलं.