20 लाखांचं मंगळसूत्र, कोट्यवधींचे कपडे...; दीपिका-रणवीरच्या लग्नासाठी नेमका किती झाला खर्च? By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 12:58 PM1 / 7बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस आहे. दीपिकाचा बोल्ड अँड ब्यूटीफूल अंदाज नेहमीच चाहत्यांना आवडतो. तिच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ होतात. सध्या ती पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. दीपिका तिच्या फिल्मी लाईफमुळे चर्चेत असते, पण त्यासोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत आहे. 2 / 7रणवीर सिंह आणि तिची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या जोड्यांमधील एक आहे. लग्न झाल्यापासून दोघेही प्रसिद्धीच्या झोतात राहतात. दीपिका आणि रणवीरचे लग्न 14 नोव्हेंबर 2018 रोजी अत्यंत शाही पद्धतीने झाले. दोघांच्या लग्नात खूप खर्च झाला होता. 3 / 7रिपोर्ट्सनुसार, दीपिका-रणवीरचे लग्न बॉलिवूडमधील सर्वात महागडे लग्न आहे. आज म्हणजेच 5 जानेवारीला दीपिका 37 वर्षांची झाली असून तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया दीपिका-रणवीरच्या लग्नात नेमका किती खर्च झाला.4 / 7दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचे आयोजन इटलीमध्ये करण्यात आले होते. दोघांनी इटलीतील तिसरे सर्वात मोठे लेक कोमो येथील विला डेल बाल्बियानेलो येथे लग्न केले. हा व्हिला अतिशय आलिशान आहे, तर त्याची किंमतही हैराण करणारी आहे.5 / 7रिपोर्ट्सनुसार, 26000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या रिसॉर्टमध्ये 75 खोल्या आहेत, ज्या दीपिका-रणवीरने त्यांच्या पाहुण्यांसाठी बुक केल्या होत्या. त्यावेळी दोघांनी एका रात्रीसाठी एका खोलीसाठी सुमारे 33 हजार रुपये दिल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार संपूर्ण 75 खोल्यांसाठी एका रात्रीचा खर्च 24 लाख 75 हजार रुपये आला. 6 / 7दीपिका आणि रणवीरने एका आठवड्यासाठी हे रिसॉर्ट बुक केले होते, ज्याचा एकूण खर्च 1 कोटी 73 लाख रुपयांपेक्षा जास्त होता. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनीही त्यांच्या लग्नाच्या पोशाखांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. 7 / 7रिपोर्टनुसार, दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत 20 लाख रुपये होती. ते मंगळसूत्र हिऱ्याचे होते. दोघांच्या लग्नाचा सोहळा अतिशय शाही पद्धतीने पार पडला. दोघांच्या लग्नाच्या एकूण खर्चाबद्दल बोलायचे झाले तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये लग्नात जवळपास 95 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications