Join us  

२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 5:04 PM

1 / 8
बॉलिवूडचा आयकॉनिक सिनेमा सूर्यवंशम रिलीज होऊन आज २५ वर्ष पूर्ण झालेत. सूर्यवंशम फिल्म १९९९ मध्ये रिलीज करण्यात आली होती. त्यात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. ते हिरा ठाकूर आणि भानुप्रताप यांच्या भूमिकेत दिसून आले. या दोन्ही भूमिकांमध्ये दरार होती
2 / 8
बाप-मुलाच्या नात्यात असलेला दुरावा आणि प्रेम यामुळे आजही हा सिनेमा लोकांच्या पसंतीस पडतो. आजही हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जातो आणि लोकही तितक्याच आवडीने तो पाहतात. परंतु मागील २५ वर्षात या सिनेमातील कलाकार बरेच बदलले आहेत.
3 / 8
बॉलिवूडचा शहनशाह म्हणून प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात हिरा ठाकूर आणि भानू प्रताप या दुहेरी भूमिकेत दिसले होते. ही भूमिका बाप-लेकाची होती. ज्यांच्यात दुरावा होता. या दोन्ही भूमिकेत अमिताभ बच्चन यांनी छाप सोडली. अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा घराघरात हिट झाला.
4 / 8
सूर्यवंशममध्ये ठाकूर भानु प्रताप सिंह यांचा नातू आणि हिरा ठाकूर यांचा मुलगा भानु प्रताप भूमिका निभावणाऱ्या कलाकाराचं नाव आनंद वर्धन आहे. आनंद आता खूप बदलला आहे. त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंद वर्धन पुन्हा सोशल मिडिया सक्रीय झाला. लवकरच तो तेलुगु सिनेमात लीड एक्टरमधून नजरेस येईल
5 / 8
या सिनेमात प्रमुख अभिनेत्रीची भूमिका सौंदर्याने निभावली. राधा सिंह असं अभिनेत्री सौंदर्याच्या भूमिकेचं नाव होते. ती हिरा ठाकूरची पत्नी दाखवली होती. या भूमिकेत तिने चाहत्यांची मने जिंकली. अभिनेत्री सौंदर्या आता या जगात नाही. वयाच्या ३१ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. एका विमान अपघातात तिचा जीव गेला.
6 / 8
अनुपम खेर, अमिताभ बच्चन यांच्या हिरा ठाकूर या भूमिकेला सपोर्ट करणारे अनुपम खेर हे सिनेमावेळी यंग होते. सिनेमात धर्मेंद्र नावाची भूमिका त्यांनी साकारली. अनुपम खेर यांच्यात २५ वर्षापूर्वीचे आणि आत्ताचे यात फारसा काही बदल झालेला दिसत नाही.
7 / 8
कादर खान हेदेखील सूर्यवंशममध्ये होते. त्यांची भूमिका रिटायर्ड मेजरची होती. या भूमिकेचं नाव होतं, रणजित सिंह, सध्या कादर खान हेदेखील या जगात नाहीत. अनेक सिनेमांमध्ये अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेते कादर खान यांनी २०१८ साली या जगाचा निरोप घेतला.
8 / 8
शिवाजी साटम, फिल्म सूर्यवंशममध्ये राधाच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. राधाच्या भूमिकेत अभिनेत्री सौंदर्या होती. शिवाजी साटम यांनी सकारात्मक भूमिका दाखवली होती. या सिनेमातून शिवाजी साटम यांना जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु सीआयडीमधील त्यांच्या भूमिकेने त्यांना मोठ्या प्रमाणात नाव मिळवून दिले.