Join us

अल्लू अर्जुन ते महेश बाबूपर्यंत बघा पहिल्या सिनेमात कसे दिसत होते साऊथचे हे १० सुपर स्टार्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 5:12 PM

1 / 11
South Film Industry's Superstar's Transformation : गेल्या काही वर्षात साऊथच्या फिल्स इंडस्ट्रीने कमालाची भरारी घेतली आहे. 'मगधीरा', 'बाहुबली', 'KGF', 'विक्रम वेधा', 'असुरन', 'लूसिफर', 'जय भीम' आणि 'पुष्पा' सारखे एकापेक्षा एक सिनेमे केवळ साऊथमधील नाही तर देशभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. परदेशातही हे सिनेमे गाजले. अल्लू अर्जुनपासून ते महेश बाबूपर्यंत या साऊथ स्टार्सच्या फॅनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अभिनेत्यांचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार आहोत. हे अभिनेते पहिल्या सिनेमात कसे दिसायचे आणि आता कसे दिसतात हा फरक यात बघायला मिळेल.
2 / 11
अल्लू अर्जुन - साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध अल्लू अर्जुनने २००३ मध्ये तेलुगु 'गंगोत्री' सिनेमातून डेब्यू केलं होतं. (Image Credit : timesofindia.indiatimes.com)
3 / 11
प्रभास - 'बाहुबली' सिनेमाने प्रभासला मोठी ओळख दिली. प्रभासने त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात २००२ मध्ये तेलुगू 'ईस्वर' सिनेमातून केली होती. त्यावेळी तो केवळ २२ वर्षांचा होता. (Image Credit : freepressjournal.in)
4 / 11
एनटीआर जूनियर - साऊथचा पावर स्टार एनटीआर ज्यूनिअर अशा कलाकारांपैकी आहे ज्याच्या सिनेमाची वाट त्याचे फॅन्स आतुरतेने बघतात. ज्यूनिअर एनटीआरने २००१ मध्ये तेलुगू सिनेमा 'निन्नू चूडलनि' मधून डेब्यू केलं होतं. (Image Credit :filmibeat.com)
5 / 11
राम चरण - सुपरस्टार राम चरण त्याच्या आगामी RRR सिनेमामुळे चर्चेत आहे. रामने २००७ मध्ये 'चिरूथा' सिनेमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केलं होतं. तो साऊथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. (Image Credit : timesofindia.indiatimes.com)
6 / 11
महेश बाबू - साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात हॅंडसम हंक महेश बाबूला कोणत्या परिचयाची गरज नाही. त्याने १९९९ मध्ये तेलुगु 'राजा कुमारूदु' सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. (Image Credit : koimoi.com)
7 / 11
विजय देवरकोंडा - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टाइल आयकन विजय देवरकोंडाने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. अर्जुन रेड्डी सिनेमातून लोकप्रिय झालेल्या विजयने २०११ मध्ये 'नुव्विला' सिनेमातून डेब्यू केलं होतं. (Image Credit : Youtube)
8 / 11
यश - कन्नड अभिनेता यश KGF नंतर मोठ्या स्टार्सच्या यादीत सामिल झाला. त्याचा आगामी 'KGF २' सिनेमाही चर्चेत आहे. यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याने २००८ मध्ये कन्नड सिनेमा 'रॉकी' मधून डेब्यू केलं होतं. (Image Credit : indiatvnews.com)
9 / 11
धनुष - साऊथचा सुपरस्टार धनुष हाही आपल्या दमदार अभियनासाठी ओळखला जातो. तो साऊथचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक कस्तूरी राजा यांचा मुलगा आहे. त्याने २००२ मध्ये तमिळ 'Thulluvadho Ilamai' सिनेमातून डेब्यू केलं होतं.
10 / 11
विजय - सध्या साऊथ फिल्स इंडस्ट्रीतील नंबर १ अभिनेता विजय आहे. त्याचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. विजयने १९९२ मध्ये तमिळ सिनेमा 'Naalaiya Theerpu' मधून डेब्यू केलं होतं.
11 / 11
सूर्या - साऊथचा सुपरस्टार सूर्या आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा 'जय भीम' हा सिनेमा चांगलाच गाजला. सूर्याने १९९७ मध्ये तमिळ सिनेमा 'Nerrukku Ner' मधून डेब्यू केलं होतं.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीधनुषप्रभासराम चरण तेजामहेश बाबू