रोहीत राऊतने गर्लफ्रेंडला असे केले रोमँटीक बर्थडे विश, पाहा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 7:09 PM1 / 9 रोहितने गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकरला सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करून अनोख्या पध्दतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 9हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. गेल्या काही वर्षांपासून जुईली आणि रोहीत रिलेशनशीपमध्ये आहेत. 3 / 9रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात. 4 / 9दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. 5 / 9व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.6 / 9नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. 7 / 9दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.8 / 9त्यांचे फोटो पाहून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे पाहायला मिळते9 / 9जुईलीसुद्धा गायिका असून 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications