आता अशी दिसते उर्मिला मातोंडकर, जाणून घ्या 'ती' सध्या काय करतेय? By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 12:18 PM1 / 13 'आजोबा' सिनेमातून उर्मिलाच्या मराठीप्रेमासोबतच प्राणीप्रेमही रसिकांनी अनुभवलं.2 / 13 गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं लाइमलाइटपासून दूर राहून आपले खासगी आयुष्य एन्जॉय करतेय.3 / 13सोशल मीडियावरही ती सक्रिय असते तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.4 / 13तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.5 / 13वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरदेखील उर्मिलाचा चार्म पुर्वीएवढाच कायम आहे. 6 / 13वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने 9 वर्षांनी लहान असलेला उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.7 / 13लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती.8 / 13 याच काळात तिच्या आयुष्यात एका व्यक्तिची एन्ट्री झाली. असे म्हणतात की, याच व्यक्तीमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले.9 / 13ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती होती दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.10 / 13उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने.11 / 13राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसे पटायचे नाही.12 / 13याचा फटका उर्मिलाला बसला. राम गोपाल वर्मांमुळे अन्य दिग्दर्शकांनी उर्मिलाचा फारसा विचार केला नाही.13 / 13याचा परिणाम म्हणजे, हळू हळू तिला काम मिळणे बंद झाले आणि उर्मिला दूर फेकली गेली. आणखी वाचा Subscribe to Notifications