Join us

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचं होतं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', पत्नीला कळताच मोडला १४ वर्षांचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 16:13 IST

1 / 8
मनोरंजनविश्वात लग्न, ब्रेकअप, अफेअर या अगदी सामान्य गोष्टी आहेत. कधी कोणाचा अनेक वर्षांचा संसार मोडेल तर कधी कोणाचं ब्रेकअप होईल सांगता येत नाही. सिनेमाच्या सेटवर सहकलाकारांच्या प्रेमात पडल्याने लग्न मोडलेले असे अनेक सेलिब्रिटी आहेत.
2 / 8
बॉलिवूडमध्ये तर अनेक सुपरस्टार्सची अफेअर्स गाजली आहे. मग ते अमिताभ-रेखा असो, सलमान खान-ऐश्वर्या राय असो. तर असेही कलाकार आहेत ज्यांनी अनेक वर्षांचा संसार मोडला आहे. अरबाज-मलायका हे तर ताजं उदाहरण आहे.
3 / 8
तर असाच आणखी एक सुपरस्टार म्हणजे हृतिक रोशन. हँडसम लूक आणि डान्सने त्याने ९० च्या दशकापासूनच प्रेक्षकांवर भुरळ घातली. 'कहो ना प्यार है' ते 'क्रिश' सारख्या सिनेमातून त्याने आपल्या अभिनयाचं दमदार प्रदर्शन केलं.
4 / 8
गेल्या काही वर्षांपासून हृतिक प्रोफेशनल कमी आणि वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. 2000 साली त्याने सुझैन खानसोबत लग्नगाठ बांधली होती. बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. मात्र काही कारणांनी दोघांनी तब्बल १४ वर्षांचा संसार मोडत 2014 साली घटस्फोट घेतला.
5 / 8
हृतिकच्या घटस्फोटाचं कारण त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं अशी चर्चा झाली. याची सुरुवात झाली ती 2010 साली आलेल्या 'काईट्स' या सिनेमामुळे. यातील मुख्य अभिनेत्री बारबरा मोरीसोबत हृतिकच्या अफेअरच्या चर्चा होत्या. हृतिक या परदेशी अभिनेत्रीच्या प्रेमात इतका बुडाला की त्याने तिला 2 कोटींची व्हॅनिटी व्हॅनही गिफ्ट दिली.
6 / 8
काही वर्षांनी 2013 साली हृतिकचं आणखी एक अफेअर चर्चेत आलं. 'क्वीन' कंगना रणौतसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. 'क्रिश 3' च्या शूटवेळी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते असं बोललं गेलं.
7 / 8
यानंतर मात्र हृतिकचा संसारच उद्धवस्त झाला. सुझैन खानने घटस्फोटाची मागणी केली. २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तर दुसरीकडे हृतिकचं ना बारबरा आणि ना कंगना कोणासोबतच फार काळ अफेअर चाललं नाही.
8 / 8
सध्या हृतिक १२ वर्षांनी लहान सबा आजादला डेट करत आहे. दोघांनी त्यांचं रिलेशनशिप जाहीररित्या मान्यही केलं आहे. दोघंही हातात हात घालुन व्हॅकेशन, रेस्टॉरंट तर कधी बॉलिवूड पार्टी, इव्हेंट्समध्ये दिसतात. त्यांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.
टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडरिलेशनशिपसुजैन खानघटस्फोट