सचिन पिळगावकरांच्या चित्रपटामुळे सुचली ‘हम आपके है कौन’ची कल्पना; सिनेमाबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत? By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 7:25 PM1 / 8फॅमिली ड्रामा असलेल्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘हम आपके है कौन’ चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. बॉलिवूडसाठी हा चित्रपट गेमचेंजर ठरला होता. सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि सलमान खान-माधुरी दीक्षित या जोडीच्या प्रेक्षक प्रेमात होते. 2 / 8‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने देशभरात ७२.४७ कोटी तर जगभरात २५० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. पुढच्या १५ वर्षात कोणत्याही चित्रपटाला सलमान-माधुरीच्या या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडता आला नव्हता. 3 / 8पण, ‘हम आपके है कौन’ चित्रपटाची मूळ कथा ही दिग्दर्शकाची नाही. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या १२ वर्षांपूर्वीच सेम कथा असलेला चित्रपट बनविण्यात आला होता. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत होते. ‘नदिया के पार’ असं चित्रपटाचं नाव असून गोविंद मूनिस यांनी तो दिग्दर्शित केला होता. 4 / 8‘नदियां के पार’ चित्रपट हा देखील फॅमिली ड्रामा होता. लग्न झालेल्या जोडप्याच्या भावंडांच्या लव्हस्टोरीवर या चित्रपटाची कथा होती. सचिन पिळगावकर यांच्याबरोबर या चित्रपटात साधना सिंह मुख्य भूमिकेत होती. 5 / 8केशव प्रकाश मिश्रा यांच्या ‘कोहबर की शर्त’ या पुस्तकावर आधारित नदिया के पार सिनेमाची कथा होती. १८ लाखांचं बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तब्बल १३६ आठवडे हा चित्रपट सिनेमागृहांत होता, असा खुलासा सचिन पिळगावकरांनी मुलाखतीत केला होता. त्यांच्या करिअरमधील सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी नदिया के पार एक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 6 / 8१९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं मॉडर्न व्हर्जन सूरज बडजात्या यांनी ९०च्या दशकात ‘हम आपके है कौन’च्या रुपात प्रेक्षकांसमोर आणलं. ‘नदिया के पार’ ही गावात राहणाऱ्या कुटुंबाची कहाणी होती. तर ‘हम आपके है कौन’ मधील कुटुंब शहरात राहणारं होतं. 7 / 8या दोन्ही सिनेमातील पात्रे, सीन्समध्ये बरेच साम्य आढळते. ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील काही गाणी नदिया के पारमधील गाण्यांप्रमाणेच सिनेमात दाखविण्यात आली आहेत. रेणुका शहाणे यांच्या पात्राचा सिनेमात ज्याप्रमाणे मृत्यू होतो. त्याचप्रमाणे नदिया के पार मधील रुपादेखील मरण पावते. 8 / 8१२ वर्षांपूर्वी हिट ठरलेल्या चित्रपटाचा रिमेक असूनही ‘हम आपके है कौन’ चित्रपट सुपरहिट ठरला. आजही या चित्रपटावर चाहते तितकंच प्रेम करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications