पहिल्या चित्रपटातून मिळाले ७५ हजार, आता घेतेय कोटींचे मानधन; नवाजुद्दीनसोबत काम केल्यानंतर हुमाचे पलटले नशीब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 23:30 IST
1 / 8अभिनेत्री हुमा कुरेशी हिने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यापासून ते संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांमध्येही तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. 2 / 8हुमा कुरेशीने आपल्या करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष केला आहे. वाढलेल्या वजनामुळे तिला काम करण्यास अनेकदा नकारही सहन करावा लागला आहे. तिला आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून खूपच कमी फी मिळाली होती, मात्र आता ती करोडोंची फी घेते.3 / 8२००८ मध्ये हुमा कुरेशी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मुंबईत आली. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तिला अनेक नकारांचा सामना करावा लागला. तिच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी तिला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. 4 / 8यानंतर हुमा कुरेशीला अनुराग कश्यप यांनी पहिली संधी दिली आणि तिची 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी निवड झाली. जाहिरातींमध्ये हुमा कुरैशीला पाहिल्यानंतर अनुराग कश्यप यांनी तिला आपल्या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आणि तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. 5 / 8'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये हुमा कुरेशी ही अभिनेता नवाजुद्दीनच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. एका मुलाखतीत हुमा कुरैशीने स्वत: आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या अडचणींबद्दल सांगितले होते. यासोबतच तिने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या फीबद्दलही सांगितले होते. 6 / 8पहिली फी म्हणून फक्त ७५ हजार रुपये मिळाल्याचे हुमा कुरेशीने सांगितले होते. पण या चित्रपटातून तिला बरीच ओळख मिळाली. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हुमा कुरेशीने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. 7 / 8बदलापूर, जॉली एलएलबी 2 यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये हुमा कुरेशीने काम केले आहे. तिच्या करिअरमध्ये तिने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारख्या बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. 8 / 8चित्रपटांव्यतिरिक्त हुमा कुरेशीने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. 'आर्मी ऑफ द डॅड' या हॉलिवूड चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.