Tunisha Sharma Case : 'मलाच उर्दू येत नाही, मुस्लिम नसतो तर...' शिझान खानचे कोर्टात स्पष्टीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:10 AM1 / 9तुनिशा शर्मा च्या केसमध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. आज शिझान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. ११ जानेवारी रोजीच हा निर्णय होणार होता मात्र कोर्टाने निर्णय राखून ठेवला.2 / 9न्यायालयीन कोठडीत असलेला शिझान खान कडून अनेक नव्या गोष्टी समोर येत आहेत.आता शिझानने वकिलामार्फत पुन्हा नवीन खुलासा केला आहे.शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी यांनी माहिती दिली आहे.3 / 9शिझानवर तुनिशाच्या आईने अनेक आरोप केले होते. शिझानने तुनिशाला हिजाब परिधान करायला लावल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा आरोप शिझानच्या वकिलांनी फेटाळून लावला. शूटिंगदरम्यान एका सीनसाठी तिने हिजाब घातला असल्याचं त्यांनी सांगितलं. विनाकारण याला लव्ह जिहादचा अॅंगल देण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले.4 / 9तर श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर मी हादरलो म्हणून तुनिशासोबत ब्रेकअप केल्याचं शिझानने स्पष्ट केलं होतं. शिझान खानवर लव्ह जिहादचा आरोप होऊ लागल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता होतीच.5 / 9आता शिझानने कोर्टात स्वत:च्या बचावासाठी आणखी एक विधान केले आहे. 'जर मी मुसलमान नसतो तर कदाचित वाचलो असतो. मला स्वत:लाच उर्दू येत नाही मग मी तुनिशाला काय शिकवणार,' असं विधान नुकतेच शिझानने कोर्टात केले. 6 / 9शिझान आणि तुनिशाचे ब्रेकअप झाले होते. तुनिशाच्या मृत्यूशी शिझानचा काहीच संबंध नाही असं त्याचे वकील कोर्टात म्हणाले. तसेच त्यांनी या केसमध्ये तुनिशाच्या आयुष्यात इतरही मुलं होती असा खुलासा केला आहे7 / 9तुनिशा टिंडर या डेटिंग अॅपवर होती. या माध्यमातून ती अली नावाच्या मुलाच्या संपर्कात आली होती. २१ ते २३ डिसेंबर तुनिशा अलीच्या संपर्कात होती.8 / 9तर दुसरीकडे तुनिशाच्या आईने हे आरोप फेटाळले आहेत. अली हा तुनिशाचा जिम ट्रेनर होता तसेच केवळ चांगला मित्र होता असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 9 / 9शिझानच्या जामीन अर्जावर आज कोर्ट निर्णय देणार आहे. शिझानचा तुरुंगवास वाढतो की त्याची जामीनावर सुटका होते हे आज स्पष्ट होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications