सेटवर ओळख, लग्नाच्या २ वर्षात घटस्फोट, नवऱ्यावर छळाचा आरोप…; मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 3:53 PM1 / 8मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री स्नेहा चव्हाण तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. अनिकेत विश्वासरावसोबत लग्न केल्यानंतर २ वर्षांनी स्नेहा चव्हाणने घटस्फोट घेतला. 2 / 8विशेष म्हणजे घटस्फोटानंतर या अभिनेत्रीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.3 / 8अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने लाल इश्क, सिनिअर सिटीझन, ७०२ दीक्षित अशा काही सिनेमांमध्ये काम केलं होतं. तसंच अनेक गाजलेल्या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. 4 / 8गेल्या काही काळात स्नेहामध्ये खूप बदल झाला आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे. 5 / 8स्नेहा चव्हाण हिने तिचे केस एकदम बारीक कट केले आहेत. त्यामुळे तिच्या या नव्या हेअर स्टाइलची चाहत्यांमध्ये चर्चा होतीये.6 / 8स्नेहाने २०२१ मध्ये अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचार प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात मानसिक छळ, मारहाण होत असल्याचं तिने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं.7 / 8 अनिकेतपेक्षा आपण वरचढ ठरतोय म्हणून त्याने मारहाण केल्याचं तिने आरोपपत्रात म्हटलं होतं. तर, स्नेहाने पोटगी मिळावी यासाठी हा बनाव रचल्याचं अनिकेत विश्वासरावने म्हटलं होतं. त्यानंतर २ वर्षांनी २०२३ मध्ये कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला.8 / 8दरम्यान, स्नेहाप्रमाणेच तिची आई राधिका चव्हाणदेखील अभिनेत्री आहे. ‘ये है चाहतें’ या मालिकेत त्या आजीची भूमिका साकारत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications