Join us

Ileana D'Cruz : "मी चांगली आई नाही"; मुलाच्या जन्मानंतर बदललं अभिनेत्रीचं आयुष्य, पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:02 PM

1 / 13
अभिनेत्री इलियाना डिक्रूजने दीर्घ काळानंतर पडद्यावर कमबॅक केलं आहे. मुलगा कोआ फिनिक्स डोलनच्या जन्मानंतर 'दो और दो प्यार' हा तिचा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये इलियाना दिसली आहे. या चित्रपटातून इलियानाने धमाकेदार कमबॅक केलं आहे.
2 / 13
या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी आणि सेंधील राममूर्ती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. इलियाना गेल्या वर्षी आई झाली. मायकल डोलनसोबत ती सध्या मातृत्वाचा काळ एन्जॉय करत आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते.
3 / 13
इंडिया टुडेशी संवाद साधताना, इलियानाने आई होण्याचा प्रवास, लग्न, तिच्या पतीची साथ आणि बाळाचं चांगलं संगोपन याबद्दल सांगितलं. इलियानाने सुरुवातीपासूनच वैयक्तिक आयुष्य खूप प्रायव्हेट ठेवलं आहे. ते प्रोटेक्ट करून ठेवलं आहे.
4 / 13
गेल्या वर्षी, जेव्हा अभिनेत्री आई बनली आणि पोस्टपार्टम डिप्रेशनचा तिला सामना करावा लागला होता. तिने यावर एक भलीमोठी पोस्ट देखील लिहिली होती. इलियानाने सांगितलं की, तिच्या बाळाला घरी सोडून कामावर जाणे तिच्यासाठी खूप कठीण होते.
5 / 13
'हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला वाटतं हे मॉम गिल्ट कोणत्याही आईच्या मनात येत असेलच. कालचीच गोष्ट आहे, मी माझ्या आईच्या घरी गेलो होते आणि तिथून घरी परतत होते. मुलगा मागच्या सीटवर बसला होता आणि तो रडायला लागला.'
6 / 13
'मी गाडी बाजूला उभी केली आणि त्याला माझ्या मांडीवर घेऊन शांत केले, पण मी त्याला पुन्हा सीटवर बसवताच तो पुन्हा रडू लागला. मला घरी पोहोचायला 10 मिनिटे लागली आणि ती 10 मिनिटे तो रडत राहिला.'
7 / 13
'मी लवकरात लवकर घरी पोहोचावी असा विचार करत होतो. मग तो झोपला कारण तो खूप थकला होता. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मी खूप रडले आणि माझे पती म्हणाले की ठीक आहे, असं होतं. मला असं वाटलं की मी जगातील सर्वात वाईट पालक आहे. चांगली आई नाही'
8 / 13
'माझं मुल मागच्या सीटवर रडत होतं आणि मी काहीही करू शकत नाही. मला माहीत होतं की, मी लवकरात लवकर घरी पोहोचले तर माझ्या मुलालाही शांतता मिळेल. त्यामुळे मला वाटतं मॉम गिल्ट हे कोणत्याही आईच्या मनातून कधीच जात नाही.'
9 / 13
'मला खरच स्क्रीनवर परत यायचं होतं. पण हो, बाळाला घरी सोडून सेटवर यायचं असेल तर ते मी तसं करणार नाही. माझे पती माईक घरी असल्यास, मी कामावर परतण्याचा विचार करू शकते, कारण मला माहीत आहे की माझे बाळ सुरक्षित हातात आहे.'
10 / 13
'माईक एक चांगला पिता आहे. जर मी कामासाठी बाहेर जात असेल तर तो घरी असावा जेणेकरून बाळाची योग्य काळजी घेतली जाईल. पुढे काम कधी मिळेल याबाबत मी काही सांगू शकत नाही' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
11 / 13
इलियानाने लग्नाबद्दल नेहमीच मौन बाळगलं आहे. अलीकडेच तिला विचारण्यात आले की तिचा नवरा किती सपोर्टिव्ह आहे? हा प्रश्न ऐकून इलियाना खूप भावूक झाली. इलियाना म्हणाली, 'वैवाहिक जीवन खूप सुंदर चालले आहे.'
12 / 13
'माईकच्या प्रेम आणि सपोर्टबद्दल काहीही सांगणे कठीण आहे कारण तो खूप चांगला आहे. माईकने मला माझ्या सर्वात वाईट आणि माझ्या सर्वोत्तम वेळी पाहिलं आहे. तो मला ओळखतो. तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांनी मला सतत पाठिंबा दिला आहे.'
13 / 13
'माईकला माहीत आहे की मी कधी नाराज होते. कसा तरी तो माझ्या चेहऱ्यावर हसू आणतो. मी थोडी भावूक होते कारण माईकला मला नेहमी आनंदी पाहायचं असतं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.'
टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूड