Join us

श्रीदेवी यांच्या आठवणीत पती बोनी कपूर भावूक, पत्नीसोबतचा पहिला अन् शेवटचा फोटो केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:58 AM

1 / 9
अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज स्मृतीदिन. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा दुबईत अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला आणि चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.
2 / 9
'चॉंदनी', 'सीता और गीता', 'चालबाज' असे एकापेक्षा एक हिट चित्रपट करणाऱ्या श्रीदेवी आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. पत्नीच्या आठवणीत सिनेनिर्माते बोनी कपूर भावूक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पत्नी श्रीदेवी यांच्यासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो त्यांच्या आठवणी ताज्या करणारे आहेत.
3 / 9
बोनी कपूर यांनी भावना व्यक्त करणारा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते स्वत: खूप खूष दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. तर श्रीदेवी त्यांच्या गालावर किस करत आहेत. अतिशय रोमॅंटिक असा हा फोटो आहे. जस्ट एक्सप्रेसिंग असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
4 / 9
बोनी यांनी एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटोही पोस्ट केला आहे. हा त्यांचा पहिला फोटो आहे. यामध्ये श्रीदेवी पारंपारिक वेशभूषेत खूप सुंदर दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर छान हसू आहे तर बोनी हे देखील आनंदात दिसत आहेत.हा पहिला फोटो असून १९८४ सालचा असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
5 / 9
आणखी एक फॅमिली फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. हा श्रीदेवी यांच्यासोबतचा त्यांचा शेवटचा फोटो आहे. त्यामुळे हा फोटो नक्कीच भावूक करणारा आहे. दुबईतील एका फॅमिली फंक्शनमध्ये बोनी कपूर आपल्या कुटुंबासह सहभागी झालेले दिसते. यामध्ये श्रीदेवी आणि त्यांची धाकटी मुलगी खुशी कपूरही दिसत आहे. हिरव्या साडीत श्रीदेवी यांचं सौंदर्य खुलून दिसतंय. मात्र कोणी कल्पनाही केली नसेल की हा त्यांचा शेवटचा फोटो ठरेल.
6 / 9
दोन दिवसांपूर्वीच बोनी यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा श्रीदेवी यांचा ऑइल पेंटिंगवाला फोटो आहे. हा फोटो म्हणजे त्यांच्या 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमातला लुक दिसत आहे. 'ती आम्हाला वरुन बघत आहे' (Watching us) असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
7 / 9
तर तीन दिवसांपूर्वी श्रीदेवी यांचा आणखी एक ऑइल पेंटिंग केलेला फोटो पोस्ट केला आहे. याला त्यांनी अतिशय भावूक कॅप्शन दिले आहे. 'तू आम्हाला ५ वर्षांपूर्वी सोडून गेलीस. तुझं प्रेम आणि आठवणी आमच्यासोबत कायम राहतील. '
8 / 9
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिनेही तीन दिवसांपूर्वीच आईच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने श्रीदेवी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. जान्हवी आईकडे प्रेमाने बघत आहे. 'आई मी अजूनही तुला सगळीकडे शोधत आहे. तरी मी जे काही करते ते या आशेने करते की तुला अभिमान वाटेल. मी जिथे जाते आणि जे काही करते, ते तुझ्यापासून सुरु होते आणि तुझ्यावरच संपते' असं भावनिक कॅप्शन तिने दिले आहे.
9 / 9
अतिशय कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.2017 मध्ये त्यांनी 'मॉम' या सिनेमात काम केले. हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
टॅग्स :श्रीदेवीबोनी कपूर