Join us

Indian Idol 12 फेम सायली कांबळेच्या लग्नाला झाले ६ महिने पूर्ण, शेअर केले रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 5:06 PM

1 / 10
सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.
2 / 10
सायली कांबळे हिने प्रियकर धवल पाटील याच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला नुकतेच ६ महिने पूर्ण झाले आहेत.
3 / 10
लग्नाला ६ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धवल पाटीलने इंस्टाग्रामवर त्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
धवल पाटीलने फोटो शेअर करत लिहिले की, आनंदी सहा महिने बायको. धनिसा.
5 / 10
धवल पाटील याने शेअर केलेल्या फोटोत तो आणि सायली रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
6 / 10
सायली आणि धवल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे आणि त्यांच्याशी संबंधित विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.
7 / 10
बऱ्याचदा सायली आणि धवल सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
8 / 10
सायली कांबळेने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
9 / 10
महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते.
10 / 10
सायली कांबळेने ‘इंडियन आयडल १२’ संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधीकृत घोषणा केली होती.
टॅग्स :इंडियन आयडॉल