Join us

Ranbir Alia Wedding : शाही लग्नाचे शानदार फोटो! पाहा, रणबीर व आलियाच्या लग्नाचे तुम्ही न पाहिलेले Inside Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:00 AM

1 / 16
रणबीर कपूर व आलिया भट या बॉलिवूडच्या क्यूट कपलनं काल लग्नाच्या आणाभाका घेतल्या. क्यूट कपलचे लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता या लग्नाचे इनसाईड फोटो समोर आले आहेत. (pic-Alia Bhatt Instagram)
2 / 16
अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्नगाठ बांधल्यानंतर आलिया व रणबीर संध्याकाळी मीडियासमोर आले. दोघांनीही मीडियाला अशा मस्त पोझ दिल्यात. (pic-Instagram)
3 / 16
आलियाने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. पण इनसाईड फोटोही असेच शानदार आहेत.
4 / 16
आलिया व रणबीरने केक कापून आनंद साजरा केला. यानंतर शॅम्पेनसह लग्न सेलिब्रेट केलं. (pic-Riddhima Kapoor Instagram)
5 / 16
आलिया व रणबीरच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. या फोटोत दोघंही एकमेकांमध्ये हरवलेले दिसताहेत.
6 / 16
रणबीरची बहिण रिद्धिमा कपूर हिने लग्नात धम्माल मज्जा केली. आलियाच्या लहान बहिणीसोबत तिने अशी मस्त सेल्फी घेतला. (pic-Riddhima Kapoor Instagram)
7 / 16
रणबीरचा खासम खास दोस्त अयान मुखजी आणि रिद्धिमा यांचीही धम्माल मस्ती केली. हा फोटो त्याचा पुरावा म्हणायला हवा. (pic-Riddhima Kapoor Instagram)
8 / 16
रिद्धिमाचा भावाच्या लग्नातील थाट बघण्यासारखा होता. तिने अशी मस्त पोझ दिली. (pic-Riddhima Kapoor Instagram)
9 / 16
रणबीर कपूरने काका रणधीर कपूर यांच्यासोबत फोटो काढून घेत, त्यांचे आशीर्वाद घेतले. करिनाने हा सुंदर फोटो शेअर केला आहे. (pic-kareena Kapoor Instagram)
10 / 16
लग्नात सहभागी झालेल्या खास पाहुण्यांनीही लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. नीतू कपूर यांनी हा सुंदर फोटो शेअर केला आहे. (pic-neetu Kapoor Instagram)
11 / 16
करिना कपूर व करण जोहर यांचा जलवा तर बघायलाच नको. बेबो व करणने लग्नात अशी मस्त पोझ दिली. (pic-kareena Kapoor Instagram)
12 / 16
बेबोचा लाडका जेह यानेही मामाच्या लग्नात एन्जॉय केलं. मॉम करिनासोबत मस्ती करतानाचा हा सुंदर फोटो. (pic-kareena Kapoor Instagram)
13 / 16
करिश्माने नववधू व वरासोबत मस्तपैकी फोटो काढून घेतला. तिघांनी अशी मस्त पोझ दिली. (pic-Karisma Kapoor Instagram)
14 / 16
बेस्ट सोबत बेस्ट, असं म्हणत आलियाची सावत्र बहिण पूजा भट हिने लग्नातला हा खास फोटो शेअर केला आहे. (pic-pooja bhatt Instagram)
15 / 16
या दोघी बहिणींचा हा फोटो तुम्ही बघायलाच हवा. पूजा व शाहिनने असा मस्त सेल्फी काढला. आम्ही आनंदी आहोत म्हणून..., असं कॅप्शन देत पूजाने हा फोटो शेअर केला आहे. (pic-pooja bhatt Instagram)
16 / 16
पूजाने रणबीर व आलियाच्या हवनपूजेचा फोटोही शेअर केला आहे. याच अग्नीला साक्षी मानत रणबीर व आलियाने लग्नगाठ बांधली. (pic-pooja bhatt Instagram)
टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भटकरिना कपूरकरण जोहर