International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान! By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 1:22 PM1 / 10 सिनेमा शूटिंग किंवा रोजच्या धावपळीतून वेळ काढत सेलिब्रिटीदेखील आवर्जून योग साधना करतात. फिटनेससोबच मनाची एकाग्रता आणि मन:शातीसाठी योगाचा उपयोग होतो. 2 / 10 फिटनेसच्या यादीत शिल्पा पहिल्या क्रमांकावर आहे. मनाच्या शांततेसाठी आणि शरीर सुधृढ राहावे यासाठी ती कायमच योगा करते. 3 / 10या यादीत दुसरे नाव मलायका अरोरा हिचं आहे. मलायका बॉलिवूडची फिटनेस आयकॉन आहे. वय हा फक्त एक आकडा असल्याचं तिनं आपल्या फिटनेसने सिद्ध केलं आहे. अभिनेत्री नियमितपणे योगा करते. 4 / 10अभिनेत्री आलिया भट ही उत्साही, निरोगी आयुष्य जगण्याची आकांक्षा बाळगणारी अशी अभिनेत्री असून चाहत्यांना ती नेहमीच प्रेरणा देते. 5 / 10अभिनेत्री करीना कपूरदेखील नियमित योगा करते. करीना सडपातळ शरीरयष्टीसाठी आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी योगासनं करते.6 / 10 अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही योगा करायला आवडतं. आजच्या काळात योग किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या चाहत्यांना योग करण्यासाठी प्रेरित करत असते.7 / 10अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील नियमित योगा करते. तिनं कायम योगाला कायम महत्व दिलं. फिट राहण्यासाठी अनुष्काचा योगा करण्यावर भर असतो.8 / 10सारा अली खानही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगाची मदत घेते. अभिनेत्री अनेकदा तिचे योगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.9 / 10या यादीत जान्हवी कपूरचाही समावेश आहे. जान्हवी कपूरदेखील फिटनेस फ्रिक आहे. जान्हवी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगा करण्यावर विश्वास ठेवते.10 / 10'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितदेखील बॉडी फ्लेक्सिबल आणि फिट ठेवण्यासाठी योगा करते. आणखी वाचा Subscribe to Notifications