Join us

इरफान गेल्या वर्षी उपचारामुळे झाला होता पूर्णपणे बरा, या आजाराला दिली होती झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:01 PM

1 / 9
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
2 / 9
इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. त्याने पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या.
3 / 9
तसेच लाइफ ऑफ पाय, ज्युरॅसिक वर्ल्ड यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही तो अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. इन्फर्नो या टॉम हँक्स यांच्या चित्रपटात इरफान प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
4 / 9
अभिनेता इरफान खान गेल्या दोन वर्षांपूर्वी न्यूरो एंडोक्राईन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होता. अखेर त्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या आजारावर मात केली होती.
5 / 9
उपचार पूर्ण करून इरफान भारतात परतल्यानंतर त्याने चेहऱ्यावरील मास्क हटवून मीडियाला पोझ दिली होती. एवढेच नव्हे तर इरफानने ट्विटर अकाउंटवर भावूक होऊन चाहत्यांचे आभार मानले होते.
6 / 9
इरफान खानने दोन वर्षांपूर्वी आपल्या आजाराची माहिती ट्विटरवर दिली होती. जेव्हा त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना धक्का बसला होता. बॉलिवूडमधील कलाकारांनी, त्याच्या फॅन्सने इरफान लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली होती.
7 / 9
जवळपास ९ ते १० महिन्यांच्या उपचारानंतर इरफान खान बरा झाला होता.
8 / 9
त्यानंतर त्याने अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचे चित्रीकरण देखील केले होते. त्याचा हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
9 / 9
टॅग्स :इरफान खान