Join us

इरफान खानचा लेक करतोय बॉलिवूड स्टार्सवर मात; Photoshoot मुळे येतोय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 16:30 IST

1 / 9
दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
2 / 9
इरफान खान यांची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात.
3 / 9
इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बाबिल सातत्याने प्रकाशझोतात येत आहे. अलिकडेच त्याने एक फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे तो सध्या चर्चिला जात आहे.
4 / 9
बाबिलने त्यांच्या फार्महाऊसवर खास फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 9
प्रसिद्ध फोटोग्राफर शिवाजी सेन यांनी बाबिलचं हे फोटोशूट केलं असून बाबिलकडे पाहिल्यानंतर अनेकांनी त्यात इरफानची झलक दिसल्याचं म्हटलं आहे.
6 / 9
बाबिलने फोटोशूट केलेला फार्महाऊस नाशिक येथे असल्याचं सांगण्यात येतं.
7 / 9
'हा फार्महाऊस आमच्यासाठी खास आहे. कारण, येथे माझे वडील निवांत वेळ घालवण्यासाठी यायचे. पण, या ठिकाणी आता कायम मला त्यांची उणीव भासते. त्यामुळेच या ठिकाणी मी फोटोशूट करायचा निर्णय घेतला', असं बाबिल म्हणाला.
8 / 9
पुढे तो म्हणतो, 'शिवाजी सेन यांनी माझे वेगवेगळ्या मूडमधील फोटो कॅमेरात कैद केले आहेत. या फोटोशूटपूर्वी आम्ही खूप चर्चा केली. त्यातून हे सुंदर फोटो समोर आले आहेत.'
9 / 9
दरम्यान, बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चित्रपटाविषयी त्याने मौन बाळगलं आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
टॅग्स :इरफान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा